Shanivarwada Namaz Controversy: पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्याच्या परिसरात कथित नमाज पठण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून, पतित पावन संघटना आणि सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्याच्या आवारात जोरदार आंदोलन केले.
Shanivarwada Namaz Controversy: गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण
व्हिडिओ व्हायरल होताच पतित पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारवाड्यामध्ये धाव घेतली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या जागेवर नमाज पठण झाल्याचा दावा केला जात आहे, ती जागा गोमूत्र शिंपडून तसेच शेणाने सारवून पवित्र केली. यानंतर या ऐतिहासिक ठिकाणी ‘शिववंदना’ सादर करण्यात आली.
शनिवार वाड्यात नमाज पठण चालणार नाही, हिंदू समाज आता जागृत झाला आहे ! 🚩🚩
— Dr. Medha Kulkarni (@Medha_kulkarni) October 19, 2025
🚩चलो शनिवार वाडा! 🚩
रविवार, 19 ऑक्टोबर 2025
📍 शनिवार वाडा, कसबा पोलीस चौकीसमोर
🕓 सायंकाळी 4 वाजता
—
🔥 पुण्याचे वैभव – शनिवार वाडा
ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ?
सारसबाग येथे… pic.twitter.com/EObcXMZ6Rt
Shanivarwada Namaz Controversy:खासदार मेधा कुलकर्णी यांची भूमिका
भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) खासदार मेधा कुलकर्णी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये “पुण्याचे वैभव – शनिवार वाडा ऐतिहासिक वारसा स्थळ की गैर हिंदू प्रार्थना स्थळ?” असा प्रश्न विचारला. सारसबाग येथील घटनेनंतर शनिवारवाड्यामध्ये घडलेला हा प्रकार प्रत्येक पुणेकरासाठी चिंतेचा आणि संतापाचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मेधा कुलकर्णी यांनी आंदोलन स्थळी उपस्थित राहून निषेध केला आणि स्पष्ट इशारा दिला की, यापुढे असले प्रकार आम्ही काहीही झाले तरीही खपवून घेणार नाही.
त्यांनी नमाज पठण करणाऱ्यांना आवाहन केले की, “ज्यांनी नाईलाजास्तव धर्मांतर केले आहे, त्यांनी पुन्हा हिंदू धर्मात परत यावे. त्याच धर्मात राहायचे असल्यास त्यांनी आपल्या घरी किंवा मशिदीत नमाज पठण करावे. सार्वजनिक किंवा ऐतिहासिक ठिकाणी येऊन नमाज पठण करू नये, ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.”
हिंदू संघटनांची मागणी आणि प्रशासनाला अल्टिमेटम:
या गोंधळाच्या वेळी शनिवारवाडा परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
पतित पावन संघटनेने पूर्वी या ठिकाणी साजरा होणारा माघी गणेशोत्सव पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारवाडा आवारातील एका दर्ग्याबाहेरील दिवा काढला.
हा पीर किंवा कबर अनधिकृत असल्याचे हिंदू संघटनांचे म्हणणे आहे. त्यांनी पीरचा बोर्ड काढून टाकण्याची मागणी केली आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रशासनाला या प्रकरणी कठोर कारवाई करण्यासाठी 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
हे देखील वाचा – दिवाळीत प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीत तब्बल 26 लाखाहून अधिक दिवे प्रज्वलित; एकाच वेळी 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद