Sharad Pawar Admit – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते (Nationalist Congress Party leader)शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक (Ruby Hall Clinic)येथे दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील दोन दिवस रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून त्यांना अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे तपासण्या आणि उपचारासाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.याबाबत त्यांची मुलगी आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे (WhatsApp status) माहिती दिली. त्यांनी स्टेटसमध्ये म्हटले आहे की, “आम्ही बाबांना पुन्हा पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये अॅडमिट केले आहे. त्यांना हायड्रेशनचा त्रास (dehydration issue)होत होता आणि काही तपासण्या बाकी आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. बाबांवर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार.
मागील आठवड्यातही शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर याच रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र पुन्हा अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही मिनिटांतच त्यांना सलाईन लावण्यात आले असून, सध्या डॉक्टरांची विशेष टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. ते सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत.
रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट (Dr. Parvez Grant)यांनी माहिती दिली की, पवारांची रक्ताची चाचणी आणि सिटीस्कॅन करण्यात आले असून सर्व रिपोर्ट समाधानकारक (नॉर्मल) आहे.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून केवळ विश्रांती आणि पुढील उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. दिवसात डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
हे देखील वाचा –
स्वीकृत नगरसेवक निवडीवरून मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ नाराज
वाल्मिक कराडच्या मुलांपासून आम्हाला धोका’; महादेव मुंडेंच्या पत्नीची थेट एसपींकडे धाव











