Home / महाराष्ट्र / Jarange patil:शरद पवारांनी वाटोळे केले!जरांगे पाटलांचा हल्लाबोल

Jarange patil:शरद पवारांनी वाटोळे केले!जरांगे पाटलांचा हल्लाबोल

Jarange patil -मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Jarange patil )यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरून पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे....

By: Team Navakal
Jarange patil

Jarange patil -मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Jarange patil )यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरून पहिल्यांदाच शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे. त्याचबरोबर अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यात गुप्त बैठक झाल्याचा दावाही केला. दरम्यान, हे आरोप वडेट्टीवार यांनी फेटाळून लावले आहेत.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, शरद पवारांनी ओबीसी समाजाला १९९४ साली दिलेले आरक्षण हे मराठ्यांच्या हक्काचे होते. त्यांनी आमचे वाटोळ केले. आता आम्हाला १६ टक्के आरक्षण मिळणार आहे. पण ज्यांनी ओबीसींना आरक्षण दिले त्या शरद पवारांचे उपकार ओबीसी नेत्यांना नाहीत. भुजबळ यांनी ओबीसी आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसकडे घ्यावे यासाठी वडेट्टीवार यांच्यासोबत गुप्त बैठक झाली. भुजबळ जातीयवादाच्या दंगली भडकावू शकतात.

त्यांनी पुढे सांगितले की, भुजबळांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्या डोक्यात झोपेत दगड घातला. आता ते अजित पवारांचे राजकारण संपवत आहेत. वडेट्टीवार जे बोलत आहेत ते येवल्याच्या अलीबाबाचे शब्द आहेत. हे शब्द परळीच्या टोळीने घेतलेत. आता त्यांना एक नवीन भिडू (वडेट्टीवार) भेटला आहे.

भुजबळ भेटीच्या आरोपाबाबत वडेट्टीवार म्हणाले की, माझी भुजबळ यांच्यासोबत कोणतीही गुप्त बैठक कधीच झालेली नाही. जरांगे हवेत विधाने करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रकार करत आहेत. त्यांच्या विधानात तथ्य नाही. जरांगेना मराठ्यांचे समर्थन मिळाले त्यामुळे त्यांना आपल्यापेक्षा कुणीच दुसरा नेता नाही, असे वाटत आहे.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

 कार्तिकी एकादशीच्या शासकीयमहापूजेचा मान एकनाथ शिंदेंना

नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडावर तृतीयपंथीयांची छबिना मिरवणूक..सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेचा उत्साह

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या