Sharad Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे पार्थ पवार. त्यांच्या जमीन खरेदी व्यवहाराचं प्रकरण गाजत आहे. पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. त्यांच्या अमोडिया कंपनीने पुणे कोरगाव पार्कमध्ये एक जमीन व्यवहार केला होता.
हा जमीन व्यवहार आता चांगलाच वादात सापडला आहे. कारण बाजार भावानुसार १८०० कोटी रुपये मूल्य असलेली जमीन फक्त ३०० कोटी रुपयात दिली, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यात मुद्रांक शुल्कापोटी काही कोटी रुपये भरणं देखील अपेक्षित होते. पण तिथेच स्टॅम्प ड्युटी फक्त ५०० रुपये भरली गेली असा आरोप देखील करण्यात आला. या जमीन व्यवहाराने अजित पवार यांच्या राजकीय अडचणी चांगल्याच वाढवून ठेवल्या. अखेर काल हा जमीन व्यवहार रद्द करत असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
यावरुन राज्यचे राजकारण मात्र चांगलेच ढवळून निघाले आहेत. शिवाय यावर विविध स्तरांवरून प्रतिक्रिया देखील येत आहेत. आणि आत आल्यावर प्रतिक्रिया आलाय आहे ती म्हणजे शरद पवार यांची आणि त्यांनी स्पष्टपणे या मुद्यावर आपलं मत मांडलं आहे. पार्थ पवार हे शरद पवार यांचे नातू. पार्थ पवार पुणे जमीन व्यवहार प्रकरणात चौकशी करुन वास्तव समाजासमोर आणलं पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पार्थ पवार प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे सौम्य भूमिका घेतली असलयाचे दिसते असे बोलले जात होते. त्यावर हे सुप्रिया सुळेंच व्यक्तिगत मत असू शकतं, असं शरद पवार म्हणाले.
हे देखील वाचा –Winter Season : हिवाळ्यातील कोरडेपणा करा दूर वापर हा घरगुती पदार्थ









