Shilpa Shetty Interrogation: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (shilpa shetty) कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच प्रसिद्धी जोतात असते. काही महिन्यांपूर्वी तिचा नवरा राज कुंद्रा (Raj kundra) याला देखील पोर्नोग्राफी प्रकरणात अटक करण्यात आली होती. पण आता तिच्या बद्दलची नवीन माहिती समोर येत आहे. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे दोघीही मुंबई पोलिसांच्या रडारवर आहेत. तब्बल ६० कोटी रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांची सध्या मुंबई पोलीस (Police) कसून चौकशी करत आहेत.
या पूर्वीही अश्या प्रकारच्या प्रकरणात राज कुंद्राची चौकशी करण्यात आली होती. अशातच आता राज कुंद्रापाठोपाठ शिल्पा शेट्टीचीही कसून चौकशी करण्यात आली आहे. तब्बल 4:30 तास तिची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे जबाब देखील नोंदवले आहेत. या चौकशीदरम्यान शिल्पा शेट्टीने तिच्या बँक खात्यातील काही व्यवहारांची माहिती देखील पोलिसांना दिल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये शिल्पाने पोलिसांना अनेक महत्वाची कागदपत्रे सुद्धा दिली त्याची तपासणी सुरु आहे.
नेमकं जवाबत सांगितलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रानं पोलिसांना दिलेल्या जवाबत म्हटलं कि “ज्या दीपक कोठारी यांनी फसवणुकीची तक्रार केली आहे त्यांनी एका एनबीएफसीकडून 60 कोटींचं कर्ज घेतले होत. हे कर्ज नंतर कोठारी यांच्याच कंपनीत इक्विटीमध्ये त्याच रूपांतर करण्यात आल. त्यातील काही रक्कम म्हणजे जवजवळ 20 कोटी रुपये सेलिब्रिटी प्रमोशन, ब्रॉडकास्ट आणि इतर कारणांसाठी वापरले गेले. या रकमेतील काही पैसे बिपाशा बसू आणि नेहा धुपिया यांना या कामासाठी देण्यात आले. राज यांनी या संदर्भातील प्रमोशनचे अधिकचे फोटो देखील पोलिसांना दिले.
फसवणूक प्रकरणात शिल्पशेट्टीचा नाव का आहे?
अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, फसवणूक प्रकारातील चौकशी सुरू असलेल्या कंपनीत शिल्पा शेट्टी मोठी शेयर होल्डर आहे. त्याचमुळे या प्रकरणात तिचीही चौकशी करण्यात आली. मिळालेल्या पुराव्यांवरून असं दिसून आले आहे की, कंपनीत शेयर होल्डरअसूनही, शिल्पाने सेलिब्रिटी फी वसूल केली, जे खर तर खर्च म्हणून दाखवण्यात आली होती, त्यामुळे निधीचा गैरवापर केला गेला आहे. त्यामुळे आता शिल्पा शेट्टी यातून कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्वाचाच ठरणार आहे.
हे देखील वाचा –