Home / महाराष्ट्र / Banners Outside Matoshree : यंदा मुंबईत महापौर शिवसेनेचाच; मातोश्रीबाहेर शिंदे गटाचे बॅनर

Banners Outside Matoshree : यंदा मुंबईत महापौर शिवसेनेचाच; मातोश्रीबाहेर शिंदे गटाचे बॅनर

Banners Outside Matoshree : यंदा गुलाल (victory) आपलाच आणि मुंबई महानगरपालिकेचा महापौरही (Mayor of Mumbai)शिवसेनेचाच असे बॅनर शिंदे गटाने (Shinde...

By: Team Navakal
Banners Outside Matoshree
Social + WhatsApp CTA

Banners Outside Matoshree : यंदा गुलाल (victory) आपलाच आणि मुंबई महानगरपालिकेचा महापौरही (Mayor of Mumbai)शिवसेनेचाच असे बॅनर शिंदे गटाने (Shinde faction) लावले आहेत. मातोश्रीबाहेर हे बॅनर लावून शिंदे गटाने उबाठाला (Uddhav Thackeray faction.) डिवचले आहे. महापौर पदावर दावा करत महायुतीलाही धक्का दिला आहे.

हे बॅनर वांद्रे विभागप्रमुख कुणाल रवींद्र सरमळकर (Kunal Ravindra Sarmalkar) आणि त्यांच्या पत्नी पल्लवी सरमळकर (wife Pallavi Sarmalkar)यांनी लावले आहेत. त्यावर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे फोटो आहेत. यावर कृणाल रवींद्र सरमळकर आणि पल्लवी सरमळकर यांचे मिशन मुंबई महापालिका असा उल्लेखही करण्यात आला आहे.

नंदनवन बंगल्यावर मुंबईतील आमदार, खासदार, मंत्री आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन एकनाथ शिंदे यांनी महापालिका निवडणुकांच्या (Municipal elections)तयारीसाठी सूचना दिल्या. दुसरीकडे भाजपा (BJP) १५० जागांवर लढण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.प्रमुख नेते मुंबईत महायुतीचाच (Mahayuti)विजय होईल असे वक्तव्य करत असताना शिंदे गटाने महापौर पदावर दावा करणारे बॅनर लावले आहेत. दरम्यान भाजपा १५० जागांवर लढली तर मित्रपक्षांसाठी ७७ जागा उरतील. त्यामुळे मुंबईतील जागावाटप आणि महापौर पदावरून महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


हे देखील वाचा –

पुण्यात भीषण अपघात ! 8 ठार कंटेनरचा ब्रेक फेल! धडकेमुळे वाहने पेटली

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठे सरकारी शटडाउन अखेर संपुष्टात; ट्रम्प यांची खर्च विधेयकावर स्वाक्षरी

अभियंत्याला चापटी मारणे माजी आमदार गीता जैन यांना भोवले

Web Title:
संबंधित बातम्या