MP Sanjay Raut : मराठा आरक्षण (Maratha reservation) प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची (CM Devendra Fadnavis) भूमिका वेगळी, ते परशुराम महामंडळवाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे चीनच्या भिंतीसारखे (Great Wall of China) तटस्थ आहेत. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Dcm Eknath Shinde)फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आंदोलकांना मदत करत आहेत अशी टीका आज पत्रकार परिषदेत उबाठा खासदार संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत म्हणाले की, फडणवीस सरकारने (Fadnavis government) आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ दिली, म्हणजे मेहरबानी केली म्हणावी लागेल का? जर राजकीय इच्छाशक्ती असती तर एका दिवसात आरक्षण दिले गेले असते. पण ही इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली आहे. फडणवीस म्हणतात आंदोलनावर कोणी पोळी भाजू नये, पण कोण भाजत आहे ? मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करून सर्वांना एकत्र घेऊन जरांगे पाटील यांची भेट घ्यायला हवी. आरक्षण नाकारले गेले कारण ते संविधानाच्या चौकटीत बसत नव्हते. मग संविधानाच्या चौकटीत बसणारे आरक्षण द्यावे. यासाठी फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी (PM Modi)– गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah)यांच्याकडे जावे. अमित शहा यांनी गणपतीला जाण्यापूर्वी जरांगे पाटील यांना भेटायला हवे होते, आणि फडणवीसांनी त्यांना न्यायला हवे होते. पण इथे फक्त राजकारण आणि चमकोगिरी सुरू आहे.शिंदे आंदोलकांना मदत करत आहेत, फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी आणि अजित पवार (Dcm Ajit Pawar)चीनच्या भिंती प्रमाणे तटस्थ आहेत, ही आहे का राजकीय ईच्छा शक्ती?
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Gokul Milk Price: बाप्पा पावला! गोकुळ दूध संघाचा मोठा निर्णय; दुधाच्या खरेदी दरात वाढ
‘मराठा समाजाचे बांधव….’; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर रितेश देशमुखची प्रतिक्रिया; म्हणाला…
सामना चालू असतानाच नितीश राणा-दिग्वेश राठी एकमेकांना भिडले, मैदानातच झाला मोठा वाद