Home / महाराष्ट्र / पावती दाखवूनच साई मंदिरात प्रसाद,पूजा सामान नेता येणार ! मंदिर संस्थानची नवी नियमावली

पावती दाखवूनच साई मंदिरात प्रसाद,पूजा सामान नेता येणार ! मंदिर संस्थानची नवी नियमावली

शिर्डी – भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना शिर्डीतील साईबाबा मंदिरात (Shirdi Sai Baba temple) फुले, हार, प्रसाद नेण्यास...

By: Team Navakal
Shirdi Sai Baba temple

शिर्डी – भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना शिर्डीतील साईबाबा मंदिरात (Shirdi Sai Baba temple) फुले, हार, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. परंतु आता ही बंदी उठविण्यात आली आहे.आता याबाबत नवीन नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनुसार (guidelines) भाविकांना प्रसाद व पूजा सामान खरेदीची पावती (receipt)दाखवणे बंधनकारक केले आहे.

आतापर्यंत बंदीच्या काळात प्रत्येक भाविकांची कसून तपासणी करत फुले, हार,प्रसाद मंदिराच्या प्रवेशद्वारावरच जमा करून घेतला जात होता. ही बंदी कालपासून उठवण्यात आली आहे.दुसरीकडे मंदिर संस्थानने बंदी उठवली असली तरी वेगळी नियमावली जारी केली आहे.आता साई संस्थान एम्लपॉइज क्रेडिट सोसायटीमार्फत फुले, हार, प्रसाद विक्री सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी भाविकांना रितसर बिल पावती देऊन फुले, प्रसाद देण्यात येतो. ही पावती मंदिराच्या प्रवेशद्वारावर दाखवली, तरच भाविकांना पूजेचे सामान मंदिरात नेता येणार आहे.

शिर्डीत खाजगी दुकानदारांचे दर निश्चित नसल्याने ते भाविकांना कुठलीही पावती देत नाहीत. त्यामुळे बाहेरील खाजगी दुकानदारांकडून फुले,हार,प्रसाद विकत घेणाऱ्यांची मोठी अडचण झाली आहे.खाजगी फुल,प्रसाद विक्रेत्यांसाठीही प्रशासनामार्फत लवकरच नवीन नियमावली तयार केली जाणार आहे.

Web Title:
संबंधित बातम्या

Share:

More Posts