Home / महाराष्ट्र / Shiv Sena- Rashtrawadi: शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह निर्णय होतच नाही! पुन्हा तारीख

Shiv Sena- Rashtrawadi: शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह निर्णय होतच नाही! पुन्हा तारीख

Shiv Sena- Rashtrawadi – शिवसेना, राष्ट्रवादी (Shiv Sena- Rashtrawadi ) पक्ष व चिन्हाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आज एकदा पुन्हा लांबणीवर...

By: Team Navakal
supreme court
Social + WhatsApp CTA

Shiv Sena- Rashtrawadi – शिवसेना, राष्ट्रवादी (Shiv Sena- Rashtrawadi ) पक्ष व चिन्हाची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आज एकदा पुन्हा लांबणीवर पडली. ही सुनावणी आता 23 जानेवारी रोजी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र  न्यायालयाने या प्रकरणात अद्याप कोणतीही तारीख दिलेली नाही. या प्रकरणी 4 आठवड्यांनंतर सुनावणी होईल, असे न्यायाधीशांनी म्हटल्याचे वकिलांनी नंतर सांगितल्याने सुनावणी शुक्रवारी होणार किंवा नाही याविषयीही शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे प्रलंबित असलेल्या या प्रकरणाची सुनावणी होऊन आता तरी निकाल लागेल, या आशेवर पुन्हा पाणी फेरले आहे.


शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील वाद गेल्या तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आधीच्या माहितीप्रमाणे आज  सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार  होती. मात्र, खंडपीठाच्या दैनिक कार्यसूचीत ही याचिका क्रमांक 37 वर होती. सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार, सुरुवातीचे क्रमांक ताज्या प्रकरणांसाठी असतात. म्हणून शिवसेना पक्षाविषयीची याचिका दुपारच्या सत्रात कोर्टासमोर येणार हे आधीच स्पष्ट झाले होते मात्र, सरन्यायाधीश सूर्य कांत आज केवळ दुपारी 1 वाजेपर्यंतच नियमित कामकाज पाहणार होते. त्यानंतर सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती जोयमाला बागची यांची अरवली डोंगररांगा प्रकरणातील  विशेष सुनावणी निश्चित करण्यात आली. त्यामुळे शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित प्रकरणांना पुरेसा वेळ मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.


जून 2022 मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंड पुकारले होते. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले.


निवडणूक आयोगाने 2022 मध्ये  शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण हे अधिकृत चिन्ह दिले. याविरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली याचिका गेली तीन वर्षे प्रलंबित आहे. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी अनेकदा तारखा जाहीर झाल्या. परंतु  सुनावणी प्रत्येक वेळी पुढे ढकलली गेली.

—————————————————————————————————————————–

हे देखील वाचा – 

 ६०८ दिवस अंतराळात घालवणाऱ्या सुनिता विल्यम्स ‘नासा’तून निवृत्त

संजय गांधी उद्यानातील आदिवासी रस्त्यावर; घरं रिकामी करण्याच्या आरोपावरून आंदोलन

विक्रमी वेळेत बेलासिस पूल पूर्ण; मुंबई सेंट्रलची वाहतूक सुकर होणार

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या