Home / मनोरंजन / Shiv Thakare : बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला भीषण आग; आगीचा व्हिडिओ होतोय वायरल

Shiv Thakare : बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला भीषण आग; आगीचा व्हिडिओ होतोय वायरल

Shiv Thakare : बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thakare) याच्या घराला आग लागल्याची धक्कादायक...

By: Team Navakal
Shiv Thakare
Social + WhatsApp CTA

Shiv Thakare : बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेता शिव ठाकरे (Shiv Thakare) याच्या घराला आग लागल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता शिव ठाकरे याच्या मुंबईतील घराला भीषण आग (Fire Breakout At Shiv Thakare Mumbai home) लागली आहे. शिव ठाकरेच्या (Shiv Thakare) घराचा बराचसा भाग आगीत जाळून खाक झाला आहे. सध्या त्याच्या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये आगीवर नियंत्रण मिळवल्याचे दिसत आहे. शिव ठाकरेच्या घराची भीषण अवस्था पाहून त्याचे चाहते मात्र चिंतेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. शिवाय आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा शिव ठाकरे मुंबईत नव्हता.

शिव ठाकरेच्या टीमनं याबाबत माहिती दिली असून ते सांगतात शिव ठाकरे सुखरुप आहे त्यामुळे अखेर त्याच्या चाहत्यांची चिंता थोडी कमी झाली. या दुर्घटनेत त्याला किंवा इतर कुणालाही कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसल्याची माहिती आहे.


हे देखील वाचा – Maharashtra Cabinet Meeting मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या