Home / मनोरंजन / Shivsena UBT : सत्तेचा सिंहासनासाठी लढा; मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची ४२ जणांची यादी समोर..

Shivsena UBT : सत्तेचा सिंहासनासाठी लढा; मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची ४२ जणांची यादी समोर..

Shivsena UBT : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे...

By: Team Navakal
Shivsena UBT
Social + WhatsApp CTA

Shivsena UBT : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ने अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नसली, तरी पक्षाने आतापर्यंत सुमारे ९० इच्छुकांना एबी फॉर्म वितरित केल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी ४२ संभाव्य उमेदवारांची नावे सध्या चर्चेत आहेत.

दरम्यान, २४ डिसेंबर रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र येत ऐतिहासिक युतीची घोषणा केली. या घोषणेमुळे मुंबईच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले असून, आगामी महापालिका निवडणूक ‘ठाकरे बंधू विरुद्ध महायुती’ असा थेट सामना होणार असल्याचे स्पष्ट समोर आहे.

मुंबई महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी ११४ जागांचा बहुमताचा जादुई आकडा गाठणे अनिवार्य आहे. एकूण २२७ जागांसाठी ही निवडणूक होणार असून, प्रत्येक पक्षाची रणनीती या आकड्याभोवती फिरताना दिसत आहे.

दुसरीकडे, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ही निवडणूक एकत्र लढवणार असून राज्याच्या राजकारणाला काय नवीन वळण मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मुंबईतील निवडणूक केवळ स्थानिक सत्तेसाठी न राहता, राजकीय प्रतिष्ठेची आणि ताकद आजमावण्याची लढाई ठरणार असल्याचे चित्र आहे.

आगामी काळात उमेदवारांच्या अधिकृत याद्या, प्रचाराच्या रणनीती आणि युती-आघाड्यांच्या हालचालींमुळे मुंबईचे राजकारण अधिकच तापणार असून, ११४ चा बहुमताचा आकडा कोणाच्या गळ्यात पडतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेने दिले ‘या’ उमेदवारांना एबी फॉर्म – (Shivsena UBT Candidate List BMC Election 2026)
१) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड
२) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील
३) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर
४) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार
५) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू
६) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे
७) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे
८) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने
९) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत
१०) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी
११) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर
१२) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान
१३) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे
१४) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत
१५) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे
१६) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री
१७) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर
१८) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे
१९) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत
२०) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर
२१) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव
२२) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे
२३) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे
२४) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख
२५) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील
२६) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर
२७) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे
२८) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे
२९) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे
३०) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे
३१) प्रभाग क्रमांक १५० – सुप्रदा फातर्फेकर
३२) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर
३३) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले
३४) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके
३५) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे
३६) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड
३७) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ
३८) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे
३९) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बाळसराफ
४०) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर
४१) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर
४२) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक

या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने एबी फॉर्म देत उमेदवार निवडीची प्रक्रिया वेगाने सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे. जाहीर झालेल्या ४२ संभाव्य उमेदवारांच्या यादीनंतर उर्वरित उमेदवारांची अधिकृत घोषणा कधी होणार, याकडे पक्षातील कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीमुळे निर्माण झालेल्या नव्या राजकीय समीकरणांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कोणती रणनिती अवलंबते, तसेच महायुती त्याला कसा प्रतिउत्तर देते, यावर आगामी निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी सुरू झालेल्या या निर्णायक लढतीत ११४ जागांचा बहुमताचा आकडा कोण गाठतो, हे येत्या काळात स्पष्ट होणार असून, या निवडणुकीकडे केवळ मुंबईच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

हे देखील वाचा – Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो उरले फक्त काही तास! eKYC साठी 31 डिसेंबरची डेडलाईन; घाई करा अन्यथा पैसे थांबणार

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या