Sindhudurg ZP Election Result 2026 : संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आमदार तथा माजी मंत्री नितेश राणे यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली भाजपने सर्व विरोधकांना धूळ चारत जिल्हा परिषदेच्या एकूण ५० जागांपैकी २७ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. या निकालाने तळकोकणातील राजकारणात ‘राणे ब्रँड’ची ताकद आजही कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, जिल्ह्याच्या ग्रामीण सत्तेची सूत्रे आता पूर्णपणे भाजपकडे आली आहेत.
आज सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्ह्याच्या राजकारणात एक आगळावेगळा योगायोग पाहायला मिळाला. एकीकडे कोकणची प्रतिपंढरी मानल्या जाणाऱ्या आंगणेवाडीत श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न होत असतानाच, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या विजयाचा गुलाल उधळला गेला. आंगणेवाडीच्या जत्रोत्सवाचा मुहूर्त आणि भाजपला मिळालेले हे घवघवीत यश यामुळे, “राणेंना भराडी देवी पावली” अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत. श्रद्धेचा हा उत्सव सुरू असतानाच राजकीय यशाचा आनंद द्विगुणित झाल्याने भाजप गोटात उत्साहाचे उधाण आले आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला रोखण्यासाठी कंबर कसली होती, मात्र नितेश राणे यांच्या सूक्ष्म नियोजनासमोर आणि राणे कुटुंबीयांच्या जनसंपर्कासमोर विरोधकांची सर्व गणिते कोलमडली. जिल्हा परिषदेसोबतच जिल्ह्यातील अनेक पंचायत समित्यांमध्येही भाजपने आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांनी पायाभूत सुविधा आणि स्थानिक विकासाच्या मुद्द्यावर भाजपला पसंती दिली आहे. या विजयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे कुटुंबीयांचे स्थान अधिक बळकट झाले असून, विरोधकांना आपल्या कार्यपद्धतीवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
निकालाचे स्पष्ट कल येताच जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष साजरा केला. या विजयानंतर बोलताना कार्यकर्त्यांनी हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि राणे यांच्या विकासाभिमुख राजकारणाचा असल्याचा दावा केला आहे. स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे आता जिल्ह्याचा विकास अधिक गतीने होईल, असा विश्वास नवनिर्वाचित सदस्यांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्गच्या राजकारणात आता पूर्णपणे ‘कमळ’ तेजोमय झाले असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विजय भाजपसाठी अत्यंत मोलाचा मानला जात आहे.
सिंधुदुर्गात तालुकानिहाय मतदानाचा आढावा
सावंतवाडी: ६९.५४%
वेंगुर्ला: ६९.०३ %
कुडाळ: ६०.०८ %
दोडामार्ग: ५९.८३ %
कणकवली: ५९.८१ %
मालवण: ५८.९० %
देवगड: ५७.१२ %
वैभववाडी: ५४.७९%
एकूण मतदानाचा तपशील पुढील प्रमाणे-
एकूण मतदार: ५६१,१०५
मतदान झाले: ३४७,७४९
पुरुष मतदार: १८०,३२७
महिला मतदार: १६७,४२२
भाजपचे निर्विवाद वर्चस्व; शिवसेना गटांच्या वाट्याला संमिश्र यश-
कोकणच्या राजकीय पटलावर अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ५० सदस्यीय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे संपूर्ण चित्र आता स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला बालेकिल्ला राखत निर्विवाद विजय संपादन केला आहे. ५० जागांच्या या सभागृहात भाजपने २७ जागांवर विजय मिळवत बहुमताचा २६ हा आकडा पार केला आहे. या विजयामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण सत्तेवर आता पूर्णपणे भाजपची पकड घट्ट झाली असून, विरोधकांच्या राजकीय गणितांना मतदारांनी पूर्णविराम दिला आहे.
या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे गट) जोरदार प्रयत्न करत १४ जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत. मात्र, दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला (ठाकरे गट) या निवडणुकीत मोठा फटका बसला असून, त्यांना केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. एकेकाळी जिल्ह्यात वर्चस्व असणाऱ्या ठाकरे गटाची ही घसरण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीत ६ अपक्ष उमेदवारांनी अनपेक्षित विजय मिळवून प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना धोबीपछाड दिली आहे.
भाजपने स्वबळावर बहुमताचा टप्पा ओलांडल्यामुळे आता जिल्ह्याच्या सत्तेत त्यांचे स्थान वरचढ ठरणार आहे. शिंदे गटाने १४ जागा जिंकून आपली ताकद सिद्ध केली असली, तरी भाजपच्या मोठ्या संख्येमुळे सत्तेच्या समीकरणात त्यांची भूमिका दुय्यम राहण्याची शक्यता आहे. ६ अपक्ष उमेदवारांच्या विजयाने हे स्पष्ट केले आहे की, अनेक ठिकाणी मतदारांनी पक्षीय राजकारणापेक्षा उमेदवाराच्या वैयक्तिक प्रतिमेला आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य दिले आहे.
हा निकाल आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भाजपच्या २७ जागांनी राणे कुटुंबीयांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा मोहोर उमटवली आहे, तर ठाकरे गटासाठी हा निकाल आत्मचिंतन करायला लावणारा आहे. आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाकडे आणि निवडीकडे लागले असून, जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपचा भगवा डौलाने फडकणार आहे.
जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवारांची यादी पुढील प्रमाणे-
खारेपाटण जिल्हा परिषद : प्राची इस्वालकर (भाजप) (बिनविरोध)
बांदा जिल्हा परिषद : प्रमोद कामत (भाजप) (बिनविरोध)
जाणवली जिल्हा परिषद : रुहिता तांबे (शिंदे शिवसेना) (बिनविरोध)
पडेल जिल्हा परिषद : सुयोगी घाडी (भाजप) (बिनविरोध)
बापर्डे जिल्हा परिषद : अवनी तेली (भाजप) (बिनविरोध)
पोंगुर्ले जिल्हा परिषद : अनुराधा नारकर (भाजप) (बिनविरोध)
किंजवडे जिल्हा परिषद : सावी लोके (भाजप) (बिनविरोध)
कोळपे जिल्हा परिषद : प्रमोद रावराणे (भाजप) (बिनविरोध)
उरण नवघर मतदार संघ : प्रेरणा पाटील (शिवसेना ठाकरे गट)
मालवण जिल्हा परिषद आडवली मालडी मतदारसंघ : सोनाली घाडीगांवकर (शिवसेना)
सावंतवाडी आंबोली जिल्हा परिषद : शोभा गावडे (भाजप)
कोलगाव जिल्हा परिषद : मायकल डिझोजा (भाजपचे बंडखोर उमेदवार)
तळवडे जिल्हा परिषद : संदीप गावडे (भाजप)
कोकिसरे जिल्हा परिषद : श्रावणी रावराणे (भाजप)
लोरे जिल्हा परिषद : रिध्दी सुतार (भाजप)
आडेली जिल्हा परिषद : विजय नाईक (शिवसेना ठाकरे गट)
नेरूर जिल्हा परिषद : रूपेश पावसकर (भाजपचे बंडखोर उमेदवार)
पावशी जिल्हा परिषद : दादा साईल (शिवसेना शिंदे गट)
फोंडा जिल्हा परिषद : राजन चिके (भाजप बंडखोर उमेदवार)
तुळस जिल्हा परिषद : सुजाता पडवळ (भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार)
पुरळ जिल्हा परिषद : संजय बोबडी (भाजप)
शिरगाव जिल्हा परिषद : देवदत्त दामोदर कदम (भाजप)
माडखोल जिल्हा परिषद : शिवानी नाईक (अपक्ष)
कणकवली पंचायत समिती बिनविरोध उमेदवार यादी पुढील प्रमाणे-
१)वरवडे पंचायत समिती सोनू सावंत (भाजपा)
२)नांदगाव पंचायत समिती हर्षदा वाळके (भाजप)
३) जाणवली पंचायत समिती महेश्वरी चव्हाण (भाजप)
४) बिडवाडी पंचायत समिती संजना राणे (भाजप)
५) हरकुळ बुद्रुक पंचायत समिती दिव्या पेडणेकर (भाजप)
६) नाटळ पंचायत समिती सायली कृपाळ (भाजप)
देवगड पंचायत समिती बिनविरोध उमेदवार पुढील प्रमाणे –
७)पडेल पंचायत समिती अंकुश ठूकरूल (भाजप)
८)नाडण पंचायत समिती गणेश राणे (भाजप)
९)बापर्डे पंचायत समिती संजना लाड (भाजप)
१०) फणसगाव पंचायत समिती समृद्धी चव्हाण (भाजप)
११) शिरगाव पंचायत समिती शितल तावडे (भाजप)
१२) कोटकामते पंचायत समिती ऋतुजा खाजनवाडकर (भाजप)
वैभववाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार पुढील प्रमाणे –
१३) कोकिसरे पंचायत समिती सौ.साधना नकाशे (भाजप)
वेंगुर्ले पंचायत समिती बिनविरोध उमेदवार पुढील प्रमाणे –
१४) आसोली पंचायत समिती संकेत धुरी (भाजप)
मालवण पंचायत समिती बिनविरोध उमेदवार पुढील प्रमाणे –
१५) आडवली मालडी पंचायत समिती सीमा परुळेकर (भाजप)
सावंतवाडी पंचायत समिती बिनविरोध उमेदवार पुढील प्रमाणे –
१६) शेर्ले पंचायत समिती महेश धुरी (भाजप)
दोडामार्ग पंचायत समिती बिनविरोध उमेदवार पुढील प्रमाणे –
१७) कोलझर पंचायत समिती गणेशप्रसाद गवस (शिंदे शिवसेना)
18) राजेश जाधव – भाजप
19) कणकवलीमधील खारेपाटण पंचायत समिती : गुरुप्रसाद शिंदे (शिवसेना शिंदे गट)
20) सावंतवाडी माडखोल पंचायत समिती : प्रथमेश सावंत (अपक्ष)
21) शिरवंडे पंचायत समिती : दीपक चव्हाण (शिवसेना)
22) पंचायत समिती सावंतवाडी विलवडे पंचायत समिती: प्रशांत सुकी (भाजप)
23) आंबोली पंचायत समिती: मायकल डिसोझा (शिवसेना)
24) वेंगुर्ले म्हापण पंचायत समिती: विष्णू फणसेकर (भाजप)
25) मालवण आचरा पंचायत समिती : दिपक सुर्वे (भाजप)
26) देवगड मुणगे पंचायत समिती : सदाशिव ओगले (भाजप)
27) देवगड तळवडे पंचायत समिती : सलोनी तळवडेकर (शिवसेना शिंदे गट)
28) देवगड पुरळ पंचायत समिती : संजना आळवे ( भाजप)
29) तळवडे पंचायत समिती : सुस्मिता जाधव (शिवसेना शिंदे गट)
30) मळगाव पंचायत समिती : गौरव मुळीक (भाजप)
31) परुळे पंचायत समिती : सचिन देसाई (शिवसेना शिंदे गट)
32) म्हापण पंचायत समिती : यज्ञा साळगावकर (शिवसेना शिंदे गट)
33) आडेली पंचायत समिती : नितीन मांजरेकर (अपक्ष)
34) भुईबावडा पंचायत समिती: देवानंद पालांडे (भाजप)
35) कोळपे पंचायत समिती सुवर्णा संसारे (भाजप)
36) खांबाळे पंचायत समिती मंगेश लोके (भाजप)
37) लोरे पंचायत समिती : भाजपचे सिध्देश रावराणे (भाजप)
38) उंबर्डे पंचायत समिती : भाजपचे साची कोलते (भाजप)
39) तिरलोट पंचायत समिती : रवी तिरलोटकर (भाजप)
40) माडखोल पंचायत समिती : अवनी राऊळ (अपक्ष)









