Home / आरोग्य / Skin Health : दिवाळीत प्रदूषणापासून घ्या त्वचेची काळजी..

Skin Health : दिवाळीत प्रदूषणापासून घ्या त्वचेची काळजी..

Skin Health : दिवाळी हा आनंद, रोषणाई आणि दिव्यांचा सण आहे. शिवाय दिवाळीत फटाके देखील मोठ्या प्रमाणावर फोडले जातात. अश्या...

By: Team Navakal
Skin Health

Skin Health : दिवाळी हा आनंद, रोषणाई आणि दिव्यांचा सण आहे. शिवाय दिवाळीत फटाके देखील मोठ्या प्रमाणावर फोडले जातात. अश्या वेळी हवेची गुणवत्ता देखील ढासळत जाते. अशा वेळी आपल्या त्वचेची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या दिवाळीत तुम्ही सुद्धा त्वचेला ताजेतवाने, चमकदार आणि मुख्य म्हणजे दिवाळीतील प्रदूषणा पासून बचाव करण्यासाठी काही सोप्या पद्धती वापरून पहा.

सगळ्यात आधी दिवसातून कमीतकमी ८-१० ग्लास पाणी प्यावे. पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात आणि त्वचा आतून छान होण्यास मदत मिळते. नारळाचे पाणी, ग्रीन टी आणि फळांचा रस यांचा देखील समावेश आहारात करता येतो.

दिवाळीत बहुतेक लोक खूप मेकअप करतात, आणि शिवाय बाहेरच्या प्रदूषणाचा प्रभाव देखील मोठ्या प्रमाणावर त्वचेवर होतो. त्यामुळे झोपण्याआधी चेहरा नीट स्वच्छ करा. तुम्ही घरगुती फेस पॅकसुद्धा वापरू शकता. यामुळे मृत त्वचेच्या पेशी दूर होतात आणि त्वचा अधिक चमकदार दिसायला मदत मिळते.

आहाराचा थेट परिणाम देखील त्वचेवर होतो. तळलेले, जास्त मसालेदार पदार्थ टाळा आणि त्याऐवजी फळं, हिरव्या भाजीपाला आणि ट्सला आहारात जास्त प्राधान्य द्या. व्हिटॅमिन C आणि E ने समृद्ध अन्न त्वचेला मजबूती आणि नैसर्गिक चमक देण्यास मदत करते.

सणाच्या काळात घरच्या घरी सहज फेस पॅक बनवता येतो. दूध आणि हळदीचा, किंवा दही आणि बेसनाचा फेस पॅक वापरा. किंवा मुलतानी माती देखील चेहऱ्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो. हलक्या हातांनी चेहऱ्याची मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचा अधिक चमकदार बनते.


हे देखील वाचा PM Modi On INS Vikrant : पंतप्रधान मोदींनी केली आयएनएस विक्रांतवर दिवाळी साजरी, पंतप्रधान मोदींनी केले सैन्याचे कौतुक..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या