Smriti Mandhana : टीम इंडियाची उपकॅप्टन स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबत मागच्या काही काळापासून अनेक चर्चा होत होत्या. वेगवेगळे तर्क वितर्क काढले जात होते. पण आता अखेरीस स्मृतीने स्वतःच या विषयावर मौन सोडायचे ठरवले आहे. तिने सोशल मीडियावर याबाबत एक स्टोरी देखील शेयर केली आहे. स्मृती आणि पलाश यांचं लग्न मोडलं असलायचं तिच्या या स्टोरी मधून स्पष्ट होत आहे. स्मृतीने स्वत: माहिती देत याबाबत घोषणा केली आहे.
स्मृतीने पोस्ट करत म्हटलं आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवांना उधाण आले आहे, म्हणून मला आता स्वतः यावर बोलणं गरजेचं वाटतं. मी खूप खाजगी स्वभावाची व्यक्ती आहे, पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की हे लग्न रद्द झालं आहे. हा विषय मला इथंच थांबवायला आवडेल. आणि तुम्ही सगळ्यांनीही तेच करावं, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सध्या दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या वेगाने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्यासाठी आमचा वेळ द्यावा.
पुढे ती म्हणते आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं ध्येय असतं. माझ्यासाठी ते नेहमीच भारतासाठी सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळणं आणि देशासाठी जास्तीत जास्त विजेतेपदं जिंकणं हेच असणार आहे. पुढेही माझं पूर्ण लक्ष याच गोष्टीवर असेल. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याबद्दल आभारी. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. असे ती म्हणाली.
हे देखील वाचा – Goa Nightclub Fire : गोवा नाईटक्लबला आग कशामुळे लागली, अग्निशमन दलाच्या गाड्या ४०० मीटर अंतरावर का उभ्या राहिल्या? बरेच प्रश्न अनुत्तरित









