Home / महाराष्ट्र / Somnath Suryawanshi Case : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी; गृह मंत्र्यांना न्यायालयात बोलावण्याची मागणी

Somnath Suryawanshi Case : सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी उद्या पुन्हा सुनावणी; गृह मंत्र्यांना न्यायालयात बोलावण्याची मागणी

Somnath Suryawanshi Case – परभणी (Parbhani) येथील कायद्याचे शिक्षण घेत असलेला दलित विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) याचा डिसेंबर २०२४...

By: Team Navakal
somnath suryawanshi parbhani case
Social + WhatsApp CTA

Somnath Suryawanshi Case – परभणी (Parbhani) येथील कायद्याचे शिक्षण घेत असलेला दलित विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) याचा डिसेंबर २०२४ मध्ये कोठडीत (judicial custody) मृत्यू झाला होता.त्याच्या मृत्यूने राज्यात गदारोळ झाला होता. आज या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court)औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांतर्फे युक्तिवाद करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी थेट गृह खात्याच्या मंत्र्यांना (Home Minister)बोलावण्याची मागणी यांनी केली.

कोठडीतील मृत्यूनंतर मॅजिस्ट्रेट यांनी चौकशी केल्यानंतर पुढे काय करायचे? याविषयी कायद्यात कोणतीही स्पष्ट तरतूद नाही. केंद्र किंवा राज्य सरकारने त्यात आजतागायत दुरुस्ती केली नाही, असा मुद्दा प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. या प्रकरणात आता उद्या पुन्हा सुनावणी पार पडणार आहे.

सुनावणीनंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले (Prakash Ambedkar) की, पोलीस खात्याचे तसेच गृह खात्याच्या मुख्य सचिवांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. परंतु ज्यांना न्यायालयाने उपस्थित राहण्यास सांगितले आहे, त्यांना धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसून ते केवळ अंमलबजावणी करणारे अधिकारी आहेत. त्यामुळे या प्रकरणातील मूलभूत कायदेशीर त्रुटी दूर करण्यासाठी न्यायालयाने स्वतः हस्तक्षेप करावा किंवा गृह खात्याच्या मंत्र्यांना (Home Department’s Chief Secretary)न्यायालयात बोलावून हा अपूर्ण कायदा दुरुस्त करणार का ? याबाबत स्पष्ट भूमिका विचारावी.

काय आहे प्रकरण ?

परभणीत (Parbhani) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान (Constitution)प्रतिकृतीची तोडफोड झाल्यानंतर ११ डिसेंबर रोजी जिल्हा बंदच्या पार्श्वभूमीवर जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवले आणि त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक करण्यात आली. त्यांचा न्यायालयीन कोठडीत (judicial custody.)मृत्यू झाला. या घटनेनंतर सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी (Vijayabai Suryawanshi)यांनी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.


हे देखील वाचा –

 १५ वर्षांपूर्वी चेक बाऊन्स ! राजपाल यादव अडचणीत; ४ वाजेपर्यंत आत्मसमर्पणाचे आदेश

 सोन्याने भरलेली बॅग मिळूनही प्रामाणिकपणा कायम; सफाई कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकतेला रजनीकांत यांचा सलाम

व्यापार करारावरून संसदेत वादळ; ‘देश अमेरिकेकडे गहाण’- राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

Web Title:
संबंधित बातम्या