ST Bank Meeting Rada : मुंबईत आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (ST Bank Meeting) संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा झाला. या राड्याच्या व्हिडीओ सोशल मीडिया वर चांगलाच वायरल होताना दिसत आहे. गुणरत्न सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांचे कार्यकर्ते आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्त्यांममध्ये एसटी बँकेच्या कार्यालयात जोरदार हाणामारी झाली आहे.
मुंबईतील एसटी बँकेच्या कार्यालयात ही घटना घडली असून या घटनेमुळे एसटी बँकेच्या कार्यालयात मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे. या दरम्यान, दोन्ही गटांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. याच मुद्यावरून बैठकीत गोंधळ सुरु झाला आणि याचं रुपांतर हाणामारीत झालं. यामध्ये चार ते पाच संचालक जखमी देखील झाल्याची माहिती आहे. या दोन्ही गटाचा वाद आता नागपाडा पोलीस ठाण्यात पोहोचला असून एकमेकांविरोधात तक्रारी देण्यात आल्या आल्याची प्राथमिक माहिती आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी बँकेची मिटिंग बोलवली गेली होती. त्यामध्ये दिवाळी बोनस वाटपा सदंभात चर्चा करण्यात आली. याच मुद्द्यावरून सदावर्ते गट आणि अडसूळ गट यांच्यामध्ये जोरदार वाद पेटला आणि नंतर त्याचे रुपांतर हाणामारीमध्ये झालं. एसटी बँकेच्या संचालकांच्या बैठकीमध्ये बाहेरुन आलेली माणसे बसवली असल्याचा गंभीर आरोप अडसूळ गटाकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी माध्यमांशी यावर संवाद साधला आहे. ते म्हणतात “वस्तुस्थिती अशी आहे की, काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी मागे संप केला होता. मात्र, तो संप काही यशस्वी झाला नाही, त्यातील त्यांच्या मागण्या देखील पूर्ण झाल्या नाहीत. लोकांना गुणरत्न सदावर्ते यांची कार्यपद्धती रुचली नाही, त्यामुळे अनेकजण परत ज्यांच्या त्यांच्या युनियनमध्ये गेले.असेही ते मी म्हणले.
गेल्या काही दिवसांपासून बँकेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळेच या बँकेतून मोठ्या प्रमाणात ठेवीही काढण्यात येत असल्याची माहिती आता समोर येत आहेत. या आगोदर एसटी बँकेच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचा राडा कधी घडला नाही. आता या प्रकरणाला कोणतं नवीन वळण मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा – Bus Fire : जैसलमेरमध्ये अग्नितांडव; आगीत २० जणांचा मृत्यू