State Election Comission : मागच्या काही काळापासून सतत गाजत असलेला मुद्दा म्हणजे मतदान आणि मतदान यादीतील दुबार नोंदी यामुळे मागच्या काही दिवसात बरच राजकारण घडून गेलं. यात विरोधकांनी मात्र महत्वाची भूमिका बजावली. मग यात विरोधकांचा सत्याचा मोर्चा असो किंवा सत्ताधाऱयांची त्यावर टीका. पण बराच काळ उलटून गेला तरीही राज्य स्तरीय निवडणूक आयोगाकडून मात्र यावर काहीच प्रतिक्रिया आली न्हवती.
त्यामुळेच मतदार यादीतील दुबार नोंदीमुळे विरोधी पक्षांनी त्या दुरुस्त करून निवडणूक घेण्याची मागणी केलेली असतानाच आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये राज्यात जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगर पालिकांसह महानगरपालिकांची निवडणुकीची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर हि पत्रकार परिषद बोलाविली आहे. आज दुपारी ४ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी निवडणुकीची अधिकृत घोषणा केली जाण्याची दाट शक्यता असल्याची देखील माहिती आहे. यानंतर लगेचच महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होण्याची चर्चा देखील जोरदार सुरु आहे. या काळात कोणतीही लोकप्रिय घोषणा, किंवा विकासकामे केली जाणार नाहीत.

निवडणुकीची हि प्रक्रिया सुमारे दीड-दोन महिने सुरु राहणार आहे. या निवडणुका दोन-तीन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे. सगळ्यात आधी नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होतील, यानंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर महानगर पालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु याबद्दलची अधिकृत माहिती अजून समोर आली नाही.
हे देखील वाचा – Fertilizer Shortage : खताच्या टंचाईने बळीराजा त्रस्त?
								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								








