Dr. Munde suicide case – फलटण (Phaltan) उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) यांच्या आत्महत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली. डॉक्टर संघटनांनी आज निष्पक्ष चौकशी व सुरक्षेच्या मागणीसाठी राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले.
आज मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सातारा यांसारख्या प्रमुख शहरांतील सरकारी रुग्णालये (Government hospital) आणि वैद्यकीय महाविद्यालयातील (Medical College) डॉक्टरांच्या मार्ड, माई, अस्म आणि एमएसआरडीए या संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला. नो सेफ्टी, नो सर्व्हिस अशा फलकांसह डॉक्टरांनी काम बंद ठेवले. या आंदोलनामुळे राज्यातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला.
डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष व जलद चौकशी करावी, दोषींवर गुन्हा दाखल करून तत्काळ कारवाई करावी,डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कडक कायदेशीर यंत्रणा उभी करावी,महिला डॉक्टरांसाठी कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरणाची हमी द्यावी, याशिवाय एसआयटी चौकशी आणि कुटुंबाला ५ कोटींची मदत द्यावी.अशा मागण्या आंदोलनकर्त्या डॉक्टरांनी केल्या.
दरम्यान,आज आंदोलकांनी रुग्णालयातील केवळ ओपीडी सेवा बंद ठेवल्या . आपत्कालीन सेवा सुरू होत्या. मात्र मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १४ नोव्हेंबरपासून आपत्कालीन सेवाही बंद करणार असल्याचा इशारा दिला.
हे देखील वाचा –
जयपूरमध्ये मद्यधुंद ट्रक चालकाने १७ गाडयांना चिरडलं..
शिंदेंच्या शिवसेना आमदाराचं आक्षेपार्ह वक्तव्य..
अमेरिकेकडे जगाचा दीडशे वेळा विनाश करण्याएवढी अण्वस्त्रे; ट्रम्प यांनी पुन्हा धमकावले









