Home / महाराष्ट्र / Buldhana News: बुलडाण्यात विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या ३४ जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; दगडफेकीत दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना..

Buldhana News: बुलडाण्यात विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या ३४ जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; दगडफेकीत दुर्गा मातेच्या मूर्तीची विटंबना..

Buldhana News: – बुलडाण्यातील (Buldhana News) बावनबीर येथे देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली.. हि घटना...

By: Team Navakal
Buldhana News

Buldhana News: – बुलडाण्यातील (Buldhana News) बावनबीर येथे देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली.. हि घटना शनिवारी रात्री सरकारी दवाखान्या (GOVT Hospital) जवळ घडली. या दगडफेकीत आठ ते दहा नागरिक जखमी देखील झाले होते. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाही त्यांच्या वाहनावर पुन्हा दगडफेक झाली. अखेर पहाटे तीन वाजता पोलिसांच्या (Police) संरक्षणात दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर गावात प्रचंड बंदोबस्त लावला होता.

या सगळ्या प्रकाराने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होत. शिवाय अतिरिक्त पोलिस अधीक्षक खामगाव, उपविभागीय अधिकारी (पो.) तसेच सोनाळा आणि तामगाव पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला होता. या दगडफेकीत दुर्गा मातेच्या मूर्तीचा हात निखळल्याने मूर्तीची विटंबना झाली होती.

दुर्गादेवी विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना काही आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून मिरवणुकीवर दगडफेक केली. यात मिरवणुकीतील अनेक भाविक जखमी झाले. दगडफेकीत देवीच्या मूर्तीची विटंबना झाली त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. दगडफेक करण्याऱ्या ३४ जनावर गुन्हा दाखल झालेला आहे तर १२ जणांना अखेर अटक करण्यात आलेली आहे. तर गावामध्ये आता शांततेचं वातावरण दिसत आहे.

या घटनेदरम्यान अनेक नेत्यांनी याठिकाणी भेटी देखील दिल्या आहेत. दरम्यान परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सहपालकमंत्री संजय सावकारे, केंद्रीय राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव, माजी मंत्री आमदार संजय कुटे, जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे तसेच अतिरिक्त पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी बावनबिर येथे भेट देत गावातील नागरिकांशी संवाद देखील साधला. परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले आहे.


हे देखील वाचा –

महाराष्ट्राने सविस्तर अहवाल पाठवावा; मोदी सरकार तत्काळ मदत करतील ! अमित शहांचे आश्वासन

इंदू मिल स्मारक पुतळा प्रतिकृतीत दोष?डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखा दिसतच नाही!

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या