Home / महाराष्ट्र / MLA Rohit Pawar : माज दाखवू नका! रोहित पवार संतापले

MLA Rohit Pawar : माज दाखवू नका! रोहित पवार संतापले

अहिल्यानगर – कर्जत-जामखेड मतदारसंघातील (Karjat-Jamkhed constituency)आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)यांनी एका अधिकाऱ्यावर रस्त्याच्या कामावरून संताप व्यक्त केला. हा तुमच्या...

By: Team Navakal
MLA Rohit Pawar

अहिल्यानगर – कर्जत-जामखेड मतदारसंघातील (Karjat-Jamkhed constituency)आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar)यांनी एका अधिकाऱ्यावर रस्त्याच्या कामावरून संताप व्यक्त केला. हा तुमच्या बापाचा पैसा नाही. खिशातून हात काढा आणि माज दाखवू नका असे रोहित पवार यांनी सुनावले. या घटनेनंतर विरोधकांनी आमदार अधिकाऱ्यांवर दमदाटी करत असल्याचा आरोप केला.

दोन दिवसांपूर्वी कर्जत (Karjat) येथे आमसभा आयोजित करण्यात आली होती. सलग आठ तास या आमसभेत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी, दुपारी १२ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत, रोहित पवार यांनी नागरिकांच्या समस्या व अडचणी ऐकल्या. यावेळी एका चेम्बर-ड्रेनज लाईन प्रकरणी नागरिकांनी अधिकारी काम करत नाहीत. निकृष्ट दर्जाचे काम (poor-quality work a)झाले आहे, अशी तक्रार करत फोटो दाखवले. यावर अधिकारी म्हणाले की, हा फोटो कधीचा आहे, आम्ही पाहणी करू. मात्र यावर आमदार रोहित पवारांचा संताप अनावर झाला.

रोहित पवार म्हणाले की, आतापर्यंत काय गोट्या खेळत होता? लोक फोटो दाखवत आहेत, हे खोटे आहे का? ही लोक वेडी आहेत का? खिशातून हात काढा. माज दाखवू नका. हा लोकांचा पैसा आहे, तुमचा नाही. हे काम निकृष्ट आहे. तुम्ही त्यांना उद्या बघतो, करतो असे सांगता. तुमचे आणि तुमच्या अधिकाऱ्यांचे पराक्रम आम्हाला माहिती आहेत.

जसे काका तसा पुतण्या! अंजली दमानियांची टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांचा काही दिवसांपूर्वी महिला आयपीएस अधिकारी अंजली कृष्णावर (Anjali Krishna)संतापले होते. तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. आज त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांचा एका अधिकाऱ्याला दम देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. यावरून सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया (Social activist Anjali Damania)यांनी, जसे काका (Uncle) तसाच पुतण्या (Nephew) असे म्हणत त्यांनी अजित पवार आणि रोहित पवारांवर टीका केली.

अंजली दमानिया म्हणाल्या की, जसे काका तसाच पुतण्या, रोहित पवारांची ही काय भाषा? महाराष्ट्रात सरकारी कामे निकृष्ट असतात, यात काहीच शंका नाही. यावर अधिकाऱ्यांना कडक शब्दात जाब विचारला पाहिजे, यातही काही शंका नाही. पण ही भाषा? दादागिरीची भाषा रोहित पवार यांनी करू नये. अधिकाऱ्यांचे चुकले तर विधानसभेत तक्रार करा. जनता तुम्हाला यासंदर्भात धडा शिकवेल.


हे देखील वाचा – 

मंत्र्यांनो जमत नसेल तर खुर्च्या खाली करा! अजित पवारांचा दम

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू; कोडपासून ते कनेक्टिव्हिटीपर्यंत जाणून घ्या महत्त्वाची माहिती

पूनम पांडे मंदोदरीची भूमिका करणार;अयोध्येतील साधू-संतांचा विरोध

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या