Home / महाराष्ट्र / Suicide Case : राहात तालुक्यात तरुणाची आत्महत्या..तरुणाला मारहाण शिवीगाळ आणि बरच काही..

Suicide Case : राहात तालुक्यात तरुणाची आत्महत्या..तरुणाला मारहाण शिवीगाळ आणि बरच काही..

Suicide Case : आजकाल आत्महत्येचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. असाच अजून एक प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे. तरुणांच्या टोळक्याने केलेली...

By: Team Navakal
Suicide Case

Suicide Case : आजकाल आत्महत्येचं प्रमाण झपाट्याने वाढत आहे. असाच अजून एक प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे. तरुणांच्या टोळक्याने केलेली मारहाण आणि बदनामीमुळे येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाने स्वतःचा जीव दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात चार तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनिकेत वडितके वय वर्षे १७ असे या मयत तरुणाचे नाव आहे. मृत तरुणाच्या भावाने लोणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मृत अनिकेत मोटारीतून जात असताना कोल्हार- राजुरी रस्त्यावर काही तरुणांनी अडवलेहोते . यावेळी या तरुणांनी अनिकेतला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली.

या घटनेनंतर मारहाण आणि बदनामीमुळे अनिकेत निराशा झाला होता. त्याने यातूनच दुसऱ्या दिवशी मंगळवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाब समजताच नातेवाईकांनी त्याला तातडीने त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले ; परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत व्यक्तीचा भाऊ अमोल मोहन वडितके याच्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती आहे.


हे देखील वाचा – महिन्याला भरा फक्त 6,522 आणि घरी आणा Tata Tiago; जाणून घ्या फायनान्स प्लॅन

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या