Home / महाराष्ट्र / Suicide Case : प्रेयसीवर हल्ला करून प्रियकराची आत्महत्या..

Suicide Case : प्रेयसीवर हल्ला करून प्रियकराची आत्महत्या..

Suicide Case : एका तरुणाने २४ वर्षीय प्रेयसीवर चाकूने वार करत नंतर स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काळाचौकी...

By: Team Navakal
Suicide Case

Suicide Case : एका तरुणाने २४ वर्षीय प्रेयसीवर चाकूने वार करत नंतर स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काळाचौकी परिसरात आज सकाळी ११ च्या सुमारास हि घटना घडली आहे. भर दिवसा गर्दीच्या वेळी घडलेल्या या भयानक घटनेमुळे काळाचौकी परिसरात एकच खळबळ उडाली. तर सोनू बराई असं या तरुणाचं नाव असून या तरुणाचा यात मृत्यू झाला आहे.

काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरून हे दोघे चालत होते. त्यांच्यात शाब्दिक वाद सुरु झाला. अचानकपणे त्या तरुणाने आपल्या खिशातील चाकू काढला आणि तरुणीवर चाकूने वार केला. हि तरुणी जीव वाचवण्यासाठी जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये गेली. सोनू तिच्या मागे गेला आणि तिच्यावर चाकूने सपासप वार केले. यानंतर त्याने स्वतःवरही चाकूचे वार केले. वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले. या दोघांचे हि प्रेम संबंध होते.

या हल्ल्यात दोघेजण हि गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असलेल्या सोनूचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.आणि आता संध्यकाळच्या सुमारास तरुणीचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचे नाते तुटले होते. त्यावरून संतापलेल्या तरुणाने हा हल्ला केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


हे देखील वाचा – Pakistan Bans Terrorist Activities : पाकिस्तानने कोणत्या दहशतवादी संघटनेवर घातली बंदी?

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या