Home / महाराष्ट्र / Sunetra Pawar :  सुनेत्रा पवार ‘या’ तारखेला पदभार स्वीकारणार; कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार

Sunetra Pawar :  सुनेत्रा पवार ‘या’ तारखेला पदभार स्वीकारणार; कॅबिनेट बैठकीला उपस्थित राहणार

Sunetra Pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दुर्दैवी...

By: Team Navakal
Sunetra Pawar
Social + WhatsApp CTA

Sunetra Pawar : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. या दुर्दैवी घटनेचा परिणाम सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या दु:खातून सावरत पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा जनसेवेसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात उपस्थित राहून पदभार स्वीकारणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कराडमध्ये प्रितीसंगमावर दर्शन

उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज साताऱ्यातील कराड येथे जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे (प्रितीसंगम) दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा घेतली.

सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबाची घेतली भेट

अजित पवार यांच्यासोबत झालेल्या त्या भीषण विमान अपघातात त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. सुनेत्रा पवार यांनी आज विशेष वेळ काढून जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. या भावुक भेटीमुळे उपस्थित कार्यकर्त्यांच्याही डोळ्यांत पाणी आले.

अस्थिकलश यात्रेमुळे कार्यकर्ते भावुक

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचे अस्थिकलश संपूर्ण राज्यभरात दर्शनासाठी पाठवण्यात आले आहेत. आज विविध जिल्ह्यांत कार्यकर्त्यांनी या कलशाचे दर्शन घेऊन आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली. बारामतीतही सध्या राज्यभरातून पदाधिकारी आणि नागरिक सांत्वनासाठी येत असून सुनेत्रा पवार तेथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली

राज्य मंत्रिमंडळाची बैठक सहसा दर मंगळवारी होत असते. मात्र, अजित पवारांच्या निधनाचे दु:ख आणि निवडणुकांच्या धामधुमीमुळे होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सुनेत्रा पवार पुढील दोन दिवस पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यानंतर ९ फेब्रुवारीला त्या प्रत्यक्ष मंत्रालयात आपल्या दालनात उपस्थित राहतील, असे समजते.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या