Sunita Charoskar & Uday Sangle expelled – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने (Nationalist Sharad Chandra Pawar group) विधानसभा निवडणूक लढवणारे उमेदवार उदय सांगळे (Uday Sangle) आणि सुनिता चोरास्कर (Sunita Charoskar) यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. हे दोघे उद्या भाजपात प्रवेश करणार आहेत.
उदय सांगळे यांनी सिन्नरमधून शरद पवार गटाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवून अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटेंना टक्कर दिली होती. पण महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी जातीय समीकरणांचा विचार करून सांगळे यांच्याशी दगाफटका केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. पराभवानंतर सांगळे यांनी पक्षापासून दूर जात भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, सुनिता चोरास्कर यांनी दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांचा पराभव अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांनी केला होता. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात त्या उद्या सकाळी ११ वाजता संस्कृती लॉन, दिंडोरी येथे भाजपात प्रवेश करणार आहेत. मात्र, भाजपा प्रवेशाआधीच दोघांची शरदचंद्र पवार गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी याबाबतचे अधिकृत पत्र जारी केले आहे. पक्षविरोधी भूमिका, स्वार्थी व दलबदलू मानसिकतेमुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे देखील वाचा –
सत्याचा मोर्चा व मूक मोर्चा; आयोजकांवर गुन्हा दाखल
पुन्हा शिवाजीराजे भोसले फक्त चित्रपट नाही! महाराष्ट्राची व्यथा; राज ठाकरेंची पोस्ट









