Home / महाराष्ट्र / Maharashtra Politics: “अजितदादांच्या नेतृत्वावर आजही विश्वास!”; सुप्रिया सुळेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Politics: “अजितदादांच्या नेतृत्वावर आजही विश्वास!”; सुप्रिया सुळेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Politics: राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित...

By: Team Navakal
Maharashtra Politics
Social + WhatsApp CTA

Maharashtra Politics: राज्यातील महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या एका विधानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

“अजित पवारांच्या कार्यक्षमतेवर आणि नेतृत्वावर माझा कालही विश्वास होता आणि आजही आहे,” असे म्हणत त्यांनी महायुती आणि महाविकास आघाडीतील चर्चांना नवीन वळण दिले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विलीनीकरण आणि भाजपच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

विलीनीकरण की केवळ निवडणूक युती?

अजित पवार आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नावर सुळे यांनी सावध भूमिका घेतली. त्या म्हणाल्या, “पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका आम्ही अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र लढवत आहोत, कारण आमची विचारसरणी एक आहे. मात्र, पक्ष विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव सध्या आमच्यासमोर नाही. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच यावर काय तो निर्णय होईल. राजकारण आणि कुटुंब या दोन भिन्न गोष्टी असून आमच्यातील राजकीय दरी अद्याप मिटलेली नाही.”

भाजपच्या ‘विश्वासार्हते’वर प्रश्नचिन्ह

अजित पवारांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ देत सुप्रिया सुळे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “अजित पवारांवर ७०,००० कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप आम्ही कधीच केले नाहीत, ते भाजपने आणि फडणवीसांनी केले होते. मग ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच सत्तेत सोबत घेऊन भाजपने आपली उरलीसुरली विश्वासार्हताही गमावली आहे. या आरोपांचे काय झाले, याचे उत्तर आता भाजपनेच द्यायला हवे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

पैशांचा पाऊस आणि यंत्रणांचा वापर

निवडणुकीत होणाऱ्या पैशांच्या वारेमाप वापराबाबत सुळे यांनी चिंता व्यक्त केली. भाजप पैशांच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी विचारले की, “जर मोदीजी भ्रष्टाचारमुक्त भारताची भाषा करतात, तर सध्याच्या राजकीय घडामोडींची ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) चौकशी का करत नाही? यामुळे सामान्य माणसाला निवडणूक लढवणे आता अशक्य झाले आहे.”

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या