Suresh Kalmadi Death : पुण्याचे माजी खासदार तसेच क्रीडा विश्वातील मोठे नाव असलेले सुरेश कलमाडी यांचे आज वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुर्दवी निधन झाले. गेल्या काही काळापासून ते आजराशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने मात्र पुण्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
सुरेश कलमाडी यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शहरातील अनेक दिग्गज राजकीय नेते आणि त्यांचे समर्थक दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी जात आहेत.
पायलट ते खासदार: एक संघर्षमय प्रेरणादायी प्रवास
भारतीय हवाई दलात ‘पायलट’ म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कलमाडींनी पुढे राजकारणात मोठे स्थान मिळवण्यात ते यशस्वी झाले. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (IOA) अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम देखील केले. ‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’च्या माध्यमातून त्यांनी पुण्याला जागतिक स्तरावर एक उच्च नाव मिळवून दिले.
हे देखील वाचा – Mohammed Shami : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस; ‘हे’ आहे कारण









