Sushma Andhare स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचे समर्थन केल्याप्रकरणी उबाठा नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare )यांना विधिमंडळाच्या हक्कभंग समितीने आज नोटीस बजावली आहे. तत्पूर्वी, गेल्या जुलैमध्ये विधान परिषदेच्या हक्कभंग समितीने अंधारे आणि कामरा यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती.
कुणाल कामराने आपल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक विडंबनकाव्य सादर केले होते. हाच व्हिडिओ अनेकांनी शेअर केला होता. अंधारेंनीदेखील तो व्हिडिओ शेअर करत पाठिंबा दर्शवला होता. यावरूनच गेल्या वर्षी मार्च महिन्यात वैजापूर येथील शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी कामरा आणि अंधारे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता.
त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी हक्कभंग समितीकडे पाठवला . आता समितीने या प्रस्तावावर सुनावणी करत अंधारे यांना नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या नोटीसनंतर अंधारे काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
नगर परिषद निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा









