Home / महाराष्ट्र / Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची रुपाली चाकणकरांवर जोरदार टीका; “तटकरेचा हात असूनही फडणवीसांनी…

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची रुपाली चाकणकरांवर जोरदार टीका; “तटकरेचा हात असूनही फडणवीसांनी…

Sushma Andhare : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (ठाकरे...

By: Team Navakal
Sushma Andhare
Social + WhatsApp CTA

Sushma Andhare : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शनिवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना चाकणकर यांच्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत प्रहार केला. “रुपाली चाकणकर यांनी आता तरी भानावर येऊन आपला सत्तेचा अहंकार त्यागला पाहिजे. तुम्ही जमिनीवर आला आहात आणि भविष्यात अधिक खाली जाल,” अशा शब्दांत अंधारे यांनी त्यांना लक्ष्य केले. केवळ राजीनामा देऊन हे प्रकरण मिटणार नाही, तर अशोक खरात याच्याकडून चालवल्या जाणाऱ्या संघटित गुन्हेगारीत चाकणकर यांचाही सहभाग असल्याने त्यांच्यावर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना सहआरोपी म्हणून अटक करावी, अशी मागणी अंधारे यांनी यावेळी लावून धरली.

चाकणकर यांनी नुकताच आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता, ज्यावेळी त्यांनी आपली बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. याला उत्तर देताना अंधारे म्हणाल्या की, “गेलेली अब्रू पुन्हा मिळवता येत नाही (बुंद से गयी वो हौदसे नही आती).” चाकणकर सध्या डॅमेज कंट्रोलचा अयशस्वी प्रयत्न करत असून त्यांनी सोशल मीडियावरील आपल्या जुन्या पोस्ट हटवू नयेत, असे आव्हानही त्यांनी दिले. अंधारे यांनी पुढे असाही दावा केला की, चाकणकर यांनी आतापर्यंत ५०० ते ६०० कोटींची अवैध संपत्ती जमवली असून सुनील तटकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा वरदहस्त असल्यानेच त्यांचा अहंकार अद्याप टिकून आहे.

अंधारे यांनी चाकणकर यांच्या दुटप्पी भूमिकेवरही सडकून टीका केली. त्या म्हणाल्या की, सार्वजनिक कार्यक्रमांत मुलींच्या हातात संविधानाची पुस्तके देण्याच्या बाता मारणाऱ्या चाकणकर प्रत्यक्षात मात्र अंधश्रद्धेच्या आहारी गेल्या आहेत. “रील्स बनवण्यासाठी पतीकडून स्वतःची पूजा करवून घ्यायची आणि प्रत्यक्षात मात्र भोंदूगिरीला खतपाणी घालायचे, हे त्यांचे खरे स्वरूप उघड झाले आहे,” अशी टिप्पणी त्यांनी केली. सुनील तटकरे यांच्या पाठींब्यामुळे आपल्याला कोणीही स्पर्श करू शकणार नाही, अशा भ्रमात चाकणकर होत्या; मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने त्यांचे सत्ताकेंद्र कोसळले आहे. तरीही त्यांची वृत्ती ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच असल्याची चपराक अंधारे यांनी लगावली.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या