Home / महाराष्ट्र / Rohit Pawar : अजित पवारांच्या अपघातावर संशय ! रोहित पवारांची मंगळवारी प्रेस कॉन्फरन्स

Rohit Pawar : अजित पवारांच्या अपघातावर संशय ! रोहित पवारांची मंगळवारी प्रेस कॉन्फरन्स

Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत...

By: Team Navakal
Rohit Pawar
Social + WhatsApp CTA
Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या अपघातावर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्यासह अजित पवार यांच्याच पक्षाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनीही अपघातावर संशय व्यक्त केला आहे. आता अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अपघाताबद्दल मी जी माहिती घेतली आहे ती  मंगळवारी 10 फेब्रुवारी रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार यांचे काय मत होते ते मी  12 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत सांगणार आहे.


अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत मी सर्व बाजूने माहिती घेत आहे. त्याचे सविस्तर सादरीकरण मी 10 फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषदेत करेन. घडलेली घटना एवढी दुःखदायक आहे की आम्ही कुटुंब अद्याप त्या धक्क्यातून सावरलेले नाही. अशा दुःखाच्या काळात आम्हा कोणाच्याही मनात राजकीय विचार येतच नाहीत. त्यामुळे पवार परिवारात  विलीनीकरणाबाबत किंवा अन्य कोणतीही राजकीय चर्चा अजून झालेली नाही. राजकीय विचार करण्याची क्षमता आमच्यामध्ये हळूहळू येईल. 9  फेब्रुवारीनंतर राजकीय चर्चेला सुरुवात होईल,असे मला वाटते,असे  रोहित पवार म्हणाले.


दोन राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबद्दल विचारले असता अजित पवारांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती, विलीनीकरणाबद्दल त्यांचे काय म्हणणे होते, हे सर्व मी 12 फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत सांगेन आणि 12 फेब्रुवारीलाच  का त्याचेही कारण मी 12 तारखेलाच सांगेन, असे सांगत रोहित पवार यांनी गूढ  कायम ठेवले. रोहित पवार यांच्या या घोषणेमुळे अपघाताबद्दल त्यांच्याकडे नेमकी काय माहिती आहे आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार यांचे नेमके काय मत होते हे जाणून घेण्याची उत्कंठा अजित पवारांचे लाखो चाहते, समर्थक आणि तमाम महाराष्ट्राला लागून राहिली आहे. अजित पवारांच्या निधनाला 13 दिवस झाल्यानंतर रोहित पवार पत्रकार परिषद घेत आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या