Home / आरोग्य / Tanning Home Remedy : टॅनिंग दूर करण्यासाठी करून पहा हे उपाय..

Tanning Home Remedy : टॅनिंग दूर करण्यासाठी करून पहा हे उपाय..

Tanning Home Remedy : बाहेरच्या प्रदूषित वातावरणामुळे आज काल टॅनिंग सारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. थोडावेळ जरी उन्हात उभे राहिल्यास...

By: Team Navakal
Tanning Home Remedy
Social + WhatsApp CTA

Tanning Home Remedy : बाहेरच्या प्रदूषित वातावरणामुळे आज काल टॅनिंग सारख्या समस्या वाढताना दिसत आहेत. थोडावेळ जरी उन्हात उभे राहिल्यास त्वचा काळी पडू लागते. म्हणूनच घराबाहेर पडताना शरीर पूर्णपणे झाकण्याचा सल्ला देखील दिला जातो. सन क्रीम आणि टॅनिंग रिमूव्हर क्रीमचे अनेक मोठे ब्रँड बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. पण या गोष्टींची किंमत जास्त असल्याने सर्वांनाच या गोष्टी परवडतीलच असे नाही. अशा वेळी सन टॅनिंग दूर करण्यासाठी करून पहा हे घरगुती उपाय.

टॅनिंग काढण्यासाठी सर्वाधिक वापरले जाते ते ​हळद आणि बेसनाचा पॅक. यासाठी अर्धा चमचा हळद, एक चमचा गुलाबपाणी आणि कच्चे दूध तसेच दोन चमचे बेसन मिसळून घ्या. आता टॅनिंग त्वचेला पाण्याने चांगले धुवून घ्या आणि टॅनिंग असलेल्या भागाला पेस्ट लावा. १० मिनिटांनंतर त्वच्या धुवून स्वच्छ करा. त्वचेचा रंग परत येईपर्यंत तुम्ही हा पॅक दर दुसऱ्या दिवशी लावा.

हात, पाय, मान किंवा चेहऱ्यावरील त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी तुम्ही दही आणि हळद यांचे मिश्रण करून लावू शकता. हे दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आणि हळदीतील दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे तुमच्या त्वचेवरील डाग जाण्यात मदत होईल. जे त्वचेची चमक वाढवते आणि मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण देखील करते.

ही पेस्ट बनवण्यासाठी तुम्हाला फक्त एक वाटी थंड दही आणि चिमूटभर हळद लागणार आहे. आंघोळ करण्यापूर्वी ते त्वचेवर लावा आणि जवजवळ २० मिनिटे चेहेऱ्याला लावून ठेवा. चांगल्या परिणामांसाठी ही पेस्ट किमान दोन आठवडे दररोज वापरली तर फरक दिसेल.


हे देखील वाचा –

Mahadev Betting App : महादेव बेटिंग अ‍ॅप घोटाळ्यातील प्रमुख आरोपी दुबईहून बेपत्ता

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या