Tanning Home Remedy : सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहिल्याने तुमची त्वचा काळी, निस्तेज आणि असमान दिसू शकते. टॅनिंगमुळे तुमच्या त्वचेवर असाच परिणाम होतो. त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुमची त्वचा अतिनील किरणांना प्रतिसाद म्हणून जास्त मेलेनिन तयार करते. या कृतीमुळे तुमच्या त्वचेवर हट्टी रंगद्रव्य येते. तुमचा चेहरा काळानुसार ठिपकेदार दिसू शकतो आणि त्याची त्वचा खडबडीत होऊ शकते.
जर तुम्हाला घरी टॅन आणि पिग्मेंटेशन काढून टाकायचे असेल, तर DIY ट्रिक्सपेक्षा बरेच चांगले उपाय आहेत. तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक पुनर्संचयित करण्यासाठी तुम्ही योग्य उत्पादने वापरू शकता, जसे की डेटन फेस मास्क शिवाय तुमच्या डॉक्टरांनी सुचवलेले सनस्क्रीन. हे तुम्हाला तुमच्या विचारापेक्षा खूप लवकर एकसमान त्वचा टोन देखील देईल.

घरगुती नैसर्गिक उपाय-
बरयाचदा बाहेर जाऊन टॅनिंग काढणं खर्चिक असत. म्हणून काही जण घरीच टॅनिंग काढण्याला प्रधान्य देतात. टॅनिग काढण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. खाली काही सोप्पे उपाय दिले आहेत. ह्या उपायनाचा अवलंब तुम्ही चेहऱ्यावर तसेच शरीराच्या इतर अवयवांवर देखील करू शकता.
एका वाटीत गरजेनुसार दही घ्या. त्यात एक चांगल्या दर्जाची कॉफी मिसळा. आणि त्यानंतर त्यात हळद मिक्स करा. शेवटी त्यात कोरफडीचा गर मिसळून घ्या आणि १ चमचा किंवा गरजेनुसार बेसनाचे पीठ घालून ते एक जीव करून घ्या. आणि हे मिश्रण चेहऱ्याला लावण्याआधी चेहरा व्यवस्थित स्वच्छ धावून घ्या आणि मग ते चेहऱ्याला लावा. आणि ३० मिनिटाने चेहरा धुवून घ्या. निकाल तुमच्या समोर असेल. तुम्हाला जर स्क्रबिंग करायची असेल तर तुम्ही बेसनाच्या पिठा ऐवजी तांदळाचे पीठ देखील तोंडाला लावू शकता. जेणेकरून तुम्हाला स्क्रबिंग करता येईल.
हे देखील वाचा –
(टीप : हा लेख माहिती म्हणून देण्यात आला आहे या माहितीची पुष्टी आम्ही करत नाही अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)









