विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेचा जामीन अर्ज मंजूर

Teacher's bail application approved for sexual assault on students

मुंबई – मुंबईच्या (Mumbai) दादरमधील (Dadar) एका नामांकित शाळेती ४० वर्षीय शिक्षिकेने (teacher) १६ वर्षीय विद्यार्थ्यांवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणात शिक्षिकेवर पॉक्सो (POCSO) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली होती. या शिक्षिकेचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने मंजूर केला आहे.

विद्यार्थ्यांच्या पालकाने आरोप केला की, १६ वर्षांच्या विद्यार्थ्याकडे आरोपी शिक्षिका आकर्षित झाली. जानेवारी २०२४ मध्ये पहिल्यांदा त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्तापित झाले. आरोपी या मुलाला हॉटेलमध्ये घेऊन जायची. तिथे ती त्याचे लैंगिक शोषण करायची. शिक्षिकेने हे सर्व आरोप फेटाळत न्यायालयात जामीन अर्ज केला.

आमच्यामध्ये जे काही घडले ते संमतीनेच झाले. मुलाची आई आपल्या नात्याविरोधात होती. त्यामुळे तिने आपल्याविरोधात खोटे आरोप केले आहेत. आपल्याला नाहक या प्रकरणात गोवण्यात आले आहे, असा दावा शिक्षिकेने न्यायालयात केला. शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार, मी डिजिटल माध्यमातून या विद्यार्थ्याच्या संपर्कात होते. मुलाच्या पालकांना त्याच्या आणि आपल्यात असलेल्या नात्याची माहिती होती. आपण विवाहित असल्याने ते या नात्याच्या विरोधात होते. यासाठीचे पुरावे म्हणून मुलाबरोबर झालेला संवाद तसेच मुलाने दिलेले शुभेच्छापत्र शिक्षिकेने न्यायालयात सादर केले .याच सर्वांच्या आधारे विशेष पॉक्सो न्यायालयाच्या न्यायमूर्ती सबिना मलिक यांनी शिक्षिकेचा जामीन मंजूर केला.