Technical Tips : फोनच्या चार्जिंग बाबत अनेक संभ्रम आजही काहींच्या मनात कायम असतील. खूपदा आपण किंवा घरातले इतर सदस्य हे फोनला १००% फुल चार्ज करण्यावर भर देतात. यामागच मूळ उद्धिष्ट असं कि जर बॅटरी फुल चार्ज केली की आपल्याला ती दीर्घ काळ वापरता येईल पर्यायाने बॅटरी दीर्घकाळ टिकेल. पण सतत १०० टक्के बॅटरी चार्ज करणं किंवा अतिरीक्त चार्ज करण्याचे नुकसान देखील खूप जास्त आहे.
बॅटरीशिवाय कोणत्याच इलेकट्रोनिक गोष्टीच काहीच अस्तित्व नाही. जर बॅटरी खराब झाली तर फोन बंद पडेल. मग हीच बॅटरी आपल्या काही छोट्या चुकांमुळे लवकर खराब होण्याचे जास्त चान्सेस असतात.
बॅटरीची काळजी कशी घ्यावी?
बॅटरीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असत. यावरची सातत्याने बोली जाणारी गोष्ट म्हणजे टीव्ही आणि वॉशिंगमशीनजवळ फोन ठेवू नका. गॅसजवळ फोन ठेवू नये. फोनमध्ये पाणी शिरु देऊ नका किंवा शिरल्यास तो तात्काळ तांदळात ठेवा.

बरेचदा असा समज असतो कि १०० टक्के बॅटरी केली तर ती दिवस भर पुरते याने तुमच्या बॅटरीला फटका देखील पडू शकतो. किंवा काही वेळेला बॅटरी १० टक्क्यांवर उतरल्यावर चार्जिंगला लावला जातो. या दोन्ही सवयी तुमच्या बॅटरीच्या आयुष्यासाठी अतिशय घातक ठरू शकतात. त्यामुळे बॅटरीचं आयुष्य कमी होण्याची जास्त शक्यता आहे.
पुढील चार्जिंगपूर्वी फोनची बॅटरी पूर्णपणे डाउन होण्याची वाट पाहू नये, सध्याच्या काळातील बॅटरी या लिथियम आयन पासून बनलेल्या बॅटरी आहेत, असं केल्यास नुकसान होऊ शकते. बॅटरी फुल चार्ज झाली किंवा १० टक्क्यांवरून कमी असेल तर तिला अधिक दबावात काम करावं लागत. यामुळे दोन्ही गोष्टी टाळल्या तर बॅटरीचं आयुष्य जास्त काळ टिकू शकत असे तज्ज्ञांचे मत आहे
हे देखील वाचा – Google Chrome : तुम्ही सुद्धा Google Chrome वापरताय का? तर आताच सावध व्हा..









