Home / महाराष्ट्र / Tejas Thackeray hospitalized : रिलायन्स रुग्णालयात तेजस ठाकरे यांच्यावर उपचार : उद्धव-रश्मी ठाकरे रुग्णालयात

Tejas Thackeray hospitalized : रिलायन्स रुग्णालयात तेजस ठाकरे यांच्यावर उपचार : उद्धव-रश्मी ठाकरे रुग्णालयात

Tejas Thackeray hospitalized – शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांचे धाकटे सुपुत्र Tejas Thackeray यांची प्रकृती अचानक बिघडल्याने...

By: Team Navakal
Tejas Thackeray hospitalized
Social + WhatsApp CTA

Tejas Thackeray hospitalized – शिवसेना (Uddhav Balasaheb Thackeray) पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांचे धाकटे सुपुत्र Tejas Thackeray यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना गिरगाव येथील रिलायन्स रुग्णालयात (Reliance Hospital) दाखल करण्यात आले आहे. गेल्या बुधवारपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.

बुधवारी संध्याकाळी अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे विविध प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मागील तीन दिवसांपासून उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.या वेळी त्यांच्या सोबत आई Rashmi Thackeray आणि वडील उद्धव ठाकरे (father Uddhav Thackeray) रुग्णालयात उपस्थित होते.

दरम्यान, महापालिका निवडणुकांमध्ये तेजस ठाकरे यांनी प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला होता. शिवसेनेसाठी महत्त्वाच्या शाखाभेटी कार्यक्रमात ते आघाडीवर होते. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासह त्यांनी दक्षिण मुंबईतील (South Mumbai.)अनेक शाखांना भेटी दिल्या होत्या. सध्या त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून (doctors.)नियमित देखरेख ठेवण्यात येत आहे.

तेजस ठाकरे कोण आहेत ? Who is Tejas Thackeray?

तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे कनिष्ठ सुपुत्र आहेत.

त्यांची मुख्य ओळख वन्यजीव संशोधक (wildlife researcher) म्हणून आहे.

फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांनी गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या पाच नवीन प्रजाती शोधून काढल्या.

त्यापैकी एका प्रजातीला त्यांच्या आडनावावरून नाव देण्यात आले.

पश्चिम घाटातील गोड्या पाण्यातील खेकड्यांच्या विविध प्रजातींच्या संशोधनात त्यांचे योगदान आहे.

सप्टेंबर २०१९ मध्ये महाराष्ट्रातील पश्चिम घाटात सापाची नवीन प्रजाती शोधण्यात आली. या संशोधनातील योगदानाबद्दल त्या प्रजातीला Boiga thackeray असे नाव देण्यात आले.


हे देखील वाचा –

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील लक्ष्मीनारायण मंदिराला पाडकामाची नोटीस; मंदिर स्थलांतराचा मुद्दा तापला

 डोंबिवलीत पहाटे ४.१५ वाजता बेसमेंटमध्ये आग; २९ दुचाकी जळून खाक ; ५ जखमी

३० जूनपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

Web Title:
संबंधित बातम्या