Home / महाराष्ट्र / मुंबै बँकेच्या संचालकपदी उबाठाच्या तेजस्वी घोसाळकर

मुंबै बँकेच्या संचालकपदी उबाठाच्या तेजस्वी घोसाळकर

मुंबई – भाजपाची (BJP) सत्ता असलेल्या मुंबै बँकेच्या (Mumbai Bank)संचालकपदी उबाठाच्या (UBT) माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (Tejaswi Ghosalkar) यांची नियुक्ती...

By: Team Navakal
Tejashwi Ghosalka director of Mumbai Bank

मुंबई – भाजपाची (BJP) सत्ता असलेल्या मुंबै बँकेच्या (Mumbai Bank)संचालकपदी उबाठाच्या (UBT) माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (Tejaswi Ghosalkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याची घोषणा आज मुंबै बँकचे अध्यक्ष भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. या नियुक्तीमुळे उबाठात नाराज असलेल्या तेजस्वी घोसाळकर यांच्या भाजपाप्रवेशाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

तेजस्वी यांचे पती अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar)२०१२ ते २०१७ दरम्यान मुंबई महापालिकेचे नगरसेवक होते. याच कालावधीत त्यांनी मुंबई बँकेचे संचालकपदही भूषवले होते. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांची हत्या झाल्यानंतर संचालकपदाची जागा रिक्त होती. हीच जागा तेजस्वी घोसाळकर यांना देण्यात आली आहे. तेजस्वी घोसाळकर या उबाठा गटाच्या माजी नगरसेविका असून, त्या पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. या सल्याचा आरोप काही दिवसांपूर्वीच केला होता. गेल्या वर्षभरापासून तेजस्वी घोसाळकर संचालकपदासाठी प्रयत्नशील होत्या. भाजपाच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने त्यांना संधी दिल्यामुळे आता त्या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहेत.


याबाबत बोलताना प्रवीण दरेकर यांनी सांगितले की,अभिषेक घोसाळकर संचालक होते. त्यांच्या हत्येनंतर ही जागा रिक्त होती. या रिक्त जागेवर नेमणूक करण्याचा अधिकार हा संचालक मंडळाला असतो. ही रिक्त जागा भरणे कायदेशीररित्या क्रमप्राप्त आहे. सद्भावना म्हणून संचालक मंडळाने एकमताने तेजस्विनी घोसाळकर यांची संचालक म्हणून नेमणूक केली.

Web Title:
For more updates: , , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या