Tejaswini Lonari : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तसेच बिग बॉस फेम तेजस्विनी लोणारी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या थोरल्या लेकासोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्यासोबत तेजस्विनी लोणारी आपली लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.नुकताच समाधान सरवणकर आणि अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचा साखरपुडा संपन्न झाला.
मुंबईतील सेंट रेगीस या पंचतारांकित हॉटेलमध्ये अगदी खासगी लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुडा पार पडला. मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने आजवर अनेक टी-व्ही सीरिअल्समध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. नो प्रॉब्लेम या चित्रपटातून तिनं चित्रपटसृष्टीत आपलं पाहिलं पाऊल ठेवलं. पण, तिला खरी ओळख मिळाली ती, ‘बिग बॉस मराठी ४’ या सगळ्यात मोठ्या वादग्रस्त प्रोगॅममुळे.
‘बिग बॉस मराठी ४ ‘मध्ये तेजस्विनी लोणारी स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. समाधान सरवणकर, तेजस्विनी लोणारीच्या साखरपुड्याला मराठी टेलिव्हिजन आणि सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावलेली. तेजस्विनीच्या साखरपुड्याला मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव, मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत, टेलिव्हिजन अभिनेता अभिजीत खांडकेकर या कलाकारांनी उपस्थिती लावली.
हे देखील वाचा – Supreme Court Stray Dogs : भटक्या कुत्र्यांचा खटला; सर्वोच्च न्यायालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना फटकारले..









