Terror Of Leopards : बिबट्या आणि बिबट्याची दहशत यामुळे महाराष्ट्रातील बराचसा ग्रामीण भाग चांगलाच हादरून गेला आहे. बिबट्याचे वारंवार होणारे हल्ले आणि या हल्ल्यात जखमी झालेले तसेच मृत्यू पावलेली बरीच लोक आहेत. ग्रामीण भागात संध्याकाळनंतर खुल्यावर फिरणं देखील कठीण झालं आहे. बिबट्याच्या हल्यात जखमी झाला किंवा मरण पावले अश्या अनेक बातम्या आपण दररोजच्या जीवनात ऐकत असतो. बिबट्यांचा सर्वत्र मुक्त संचार झाला असून त्यांची पावलं आता ग्रामीण भागाकडून शहराकडे वळली आहे.
ग्रामीण भागात तर बिबटे घराच्या अंगणात सर्रास आपल्या पंजाचे ठसे उमटवून जातात. वन्य प्राण्यांचा ग्रामीण तसेच शहरी भागात मुक्त संचार सुरु आहे. कोकणात रानडुकरं, माकडं, तळकोकणात हत्तींनी चांगलाच उच्छाद मांडला आहे. हरिश्चंद्रगडापासून कळसुबाईच्या पायथ्यापर्यंतच्या पट्ट्यात बिबट्यांचा वावर सर्वात आधी जाणवू लागला.

बिबट्यांनी शिवनेरीच्या पायाशी आपला रहिवास केल्यानंतर वन विभागाने जुन्नरला बिबट्यांसाठी तात्पुरती छावणी देखील उभारली. पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यात पकडलेले बिबटे तिकडेच बंदिस्त केले गेले. तिथे ‘बिबट सफारी’ यांसारख्या अनेक योजना जाहीर केल्या गेल्या. बिबट्यांची व्यवस्था एकदम टॉप दर्जाची केली गेली. यावर रम्य कल्पना मांडल्या गेल्या. मानव आणि वन्यप्राण्यांच्या सहजीवनाबद्दल अनेक तर्क लेख चर्चा रंगल्या. काही काळ आधी बिबट्याच्या बचावार्थ अनेक जण समोर आले. पण हि बाब नाकारता येणारच नाही कि बिबट्यांच्या उच्छादामुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवन कठीण झाले आहे.
बिबट्यांच्या सततच्या मानवी वस्तीतील वावराला माणूसच जबाबदार आहे,यात दुमत नाही. बिबट्यांची समस्या हि एकदम जटिल झाली आहे. मागच्या काही घटनांमुळे बिबट्याला दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही अनेक घटना घडल्या. मानवी वाद आणि वन्य प्राणी यामंधील संघर्ष कमी होत नाही आहे.
याच संदर्भातील एक घटना अहिल्यानगरमध्ये घडली. अहिल्यानगर तालुक्यातील कर्जुने-खारे शिवारात पाच वर्षीय मुलीला जीव घेणारा बिबट्या ठार करण्यासाठी वन विभागाचे पथक शर्थीचे प्रयत्न करत होते. सोमवारी एक बिबट्या पिंजऱ्यात बंद झाला, परंतु, गावकरी येण्यापूर्वी प्रशासनाने बिबट्याला सुरक्षित स्थळी हलवले. स्थलांतराची घाई केल्याने संतप्त गावकऱ्यांनी, हा तो बिबट्या नव्हेच, असा तगादा लावला. त्यानंतर दुपारनंतर आणखी एक बिबट्या विहिरीत पडल्याचे समोर आले. बिबट्यांना ठार मारा! अशी गावकऱ्यांची मागणी होती. परंतु, दोन्हीपैकी नरभक्षक कोणता याची तपासणी केल्याशिवाय त्याला ठार करता येणार नाही अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली. त्यामुळे गावकरी विरुद्ध प्रशासन, अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. हा सगळा प्रकार दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला आहे. त्यामुळे यावर कायमचा तोडगा काढणे हे भले मोठे आव्हान आता प्रशासनावर आहे.
हे देखील वाचा –









