Home / महाराष्ट्र / Thackeray Brothers : नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा; कोण कोणत्या भागात होणार ठाकरे बंधूंची सभा; वाचा संपूर्ण बातमी..

Thackeray Brothers : नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा; कोण कोणत्या भागात होणार ठाकरे बंधूंची सभा; वाचा संपूर्ण बातमी..

Thackeray Brothers : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे...

By: Team Navakal
Thackeray Brothers
Social + WhatsApp CTA

Thackeray Brothers : नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ९ जानेवारी रोजी नाशिकमध्ये एक ऐतिहासिक संयुक्त सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर पार पडणार असून, उबाठा आणि मनसे उमेदवारांच्या प्रचाराला मोठा वेग मिळेल, अशी अपेक्षा आहे. मुंबईसह राज्यातील विविध महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा संकल्प केला असून, ३ ते १३ जानेवारी या कालावधीत मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये त्यांची संयुक्त सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

या सभेसाठी नाशिक महानगरप्रमुख प्रथमेश गिते आणि उबाठा कार्यालयाने महापालिकेच्या जाहिरात व परवाना विभागाकडे औपचारिक पत्र दिले असून मैदानाची मंजुरी मिळाल्यानंतर आता तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. नाशिकमध्ये ही ठरलेली सभा या दोन पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांच्या एकत्र येण्याचा अनोखा प्रसंग ठरणार आहे, कारण शिवसेना आणि मनसे विभाजनानंतर उद्धव आणि राज ठाकरे स्वतंत्र पक्षांचे प्रमुख म्हणून सार्वजनिक व्यासपीठावर पहिल्यांदा एकत्र दिसणार आहेत.

मुंबईसह अन्य शहरांमध्ये रोड शो आणि प्रचारात्मक कार्यक्रमांप्रमाणेच नाशिकमध्येही आमदार आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे रोड शो करणार आहेत. त्यामुळे या सभा आणि रोड शोमुळे पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराला मोठा बळ मिळणार आहे. यामुळे स्थानिक राजकीय वातावरण अधिक तणावपूर्ण आणि उत्साही होण्याची शक्यता आहे.

उद्धव आणि राज ठाकरे यांनी याआधी एकत्रित शिवसेनेच्या काळात नाशिकमध्ये अनेकदा भाषणे केली असली तरी, विभाजनानंतर स्वतंत्र पक्षांचे नेते म्हणून ही पहिलीच एकत्रित सभा ठरणार आहे. स्थानिक पक्ष कार्यकर्त्यांनीही या ऐतिहासिक सभेची तयारी सुरू केली असून, मैदानातील व्यवस्थापन, सुरक्षा आणि प्रेक्षकांच्या सोयीसाठी आवश्यक व्यवस्था आखण्यात येत आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या