Home / महाराष्ट्र / Thackeray Brothers : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी तब्ब्ल ११ वर्षांनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र..

Thackeray Brothers : बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी तब्ब्ल ११ वर्षांनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र..

Thackeray Brothers : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे...

By: Team Navakal
Thackeray Brothers
Social + WhatsApp CTA

Thackeray Brothers : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क येथे उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बंधू पुन्हा एकत्र आल्याचे दुर्मिळ दृश्य महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळाले . राज ठाकरे यांनी सुमारे ११ वर्षांनंतर स्मृतिस्थळी उपस्थित राहून बाळासाहेबांना अभिवादन केले. यावेळी दोन्ही बंधूंमध्ये सुमारे १५ ते २० मिनिटांची चर्चा झाली. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसे युती अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेली नसताना ठाकरे बंधूंची हि आणखी एक भेट झाली.

उद्धव ठाकरे सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास कुटुंबासह स्मृतीस्थळी दाखल झाले. बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केल्यानंतर ते जवळच उभारलेल्या मंचावर कुटुंब आणि शिवसैनिकांसह बसले. त्यानंतर काही वेळातच राज ठाकरे स्मृतिस्थळी दाखल झाले. राज ठाकरे यांनी अभिवादन केल्यानंतर दोन्ही भावांमध्ये संवाद झाला. त्यानंतर मंचावर जाऊन अर्धा तासांच्या उपस्थिती दरम्यान राज ठाकरेंनी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याशीही संवाद साधला. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई हे देखील उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनीही बाळा नांदगावकर यांच्याशी संवाद साधला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी एक खास पोस्ट शेयर केली आहे. बाळासाहेबांसोबतचा जुना फोटो पोस्ट करून एक्सवर लिहिले की, बाळासाहेबांनी हिंदूंकडे व्होटबँक म्हणून पाहिले नाही. त्यांच्यासाठी हा विषय अस्मितेचा, धर्माप्रतीच्या प्रेमाचा होता. हे करताना बाळासाहेबांनी, प्रबोधनकारांकडून आलेला तर्कवाद सोडला नाही. बाळासाहेब हे कमालीचे हिंदुप्रेमी होते. पण म्हणून त्यांच्यातली चिकित्सक वृत्ती लोप पावली नाही. म्हणूनच बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मत मागणाऱ्यांची गंमत वाटते. ना त्यांना बाळासाहेब माहीत आहेत, ना त्यांना प्रबोधनकार माहित आहेत. अशी पोस्ट राज ठाकरेंनी एक्सवर केली आहे.


हे देखील वाचा – Corbett Tiger : सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंडला कॉर्बेट व्याघ्र प्रकल्पातील नुकसान दुरुस्तीचे दिले निर्देश..

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या