Thackeray Brothers : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या (Uddhav Thackeray) युतीच्या घोषणेचा मुहूर्त अखेर ठरला. उद्या २४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत असे संकेत दोन्ही पक्षांकडून देण्यात येत आहेत.
या दोन्ही नेत्यांकडून उद्या दुपारी ठाकरे बंधूंच्या युती आणि जागावाटपाची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-मनसे एकत्र आल्याने ठाकरेंची ताकद दुप्पट झाली आहे.
उद्या
— Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025
१२ वाजता pic.twitter.com/ob47tQxhGG
याबाबत आज सकाळी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांनी अधिक स्पष्टता दिली आहे. आमच्यात जागावाटपावरून कोणताही विसंवाद नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. वरळीमधील डोमममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली, असंही संजय राऊत म्हणाले. त्यानुसार, आता ट्विट करुन संजय राऊत यांनी युतीच्या घोषणेचा मुहूर्त ठरल्याचे सांगितले.
हे देखील वाचा – Prashant Jagtap Pune : दोन्ही पवार एकत्र येण्याआधीच धक्का! राष्ट्रवादीच्या युतीला बंडाची किनार…









