Thackeray Brothers : राज्य निवडणूक आयोगातर्फे पत्रकार परिषद घेऊन मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे. राज्यातील राजकारणात अनेक महत्वपूर्ण बदल देखील पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत शिवेसना-भाजपा-राष्ट्रवादी महायुती म्हणून एकत्र लढणार आहेत; तर, मुंबई (Mumbai) महापालिका आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी ठाकरे बंधूनी देखील जोर लावला आहे. त्यासाठी ठाकरे बंधूंची आपली युती देखील जाहीर केली.
दरम्यान आता सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी देखील केली आहे. याच पार्शवभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आज कांदिवली येथे पार पडला. शिवसेना आणि मनसे यांच्या युतीनंतर हा पहिलाच मेळावा होता. या मेळाव्यात विनोद घोसाळकर, विलास पोस्टनीस हेमंत कांबळे, कुणाल माईणकर, नयन कदम या मेळाव्यामध्ये सहभागी होते. मुंबईतील सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक या मेळाव्यात उपस्थित होते.
चारकोपमध्ये ठाकरेनकडून हे शक्तिप्रदर्शन पार पडले. युती संदर्भातील अधिकृत घोषणा झाल्यानंतर हा मेळावा पार पडला. दोन्ही पक्षांचा हा पहिलाच संयुक्त मेळावा होता. त्यामुळे ठाकरे बंधूंची हि युती महायुती सोबत इतर राजकीय पक्षांना भारी पडते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.









