Home / महाराष्ट्र / Thackeray Brothers : उत्तर देवांना द्यावीत, दानवांना नाहीत; युतीच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची पाठराखण…राज–उद्धव यांची ऐतिहासिक युती

Thackeray Brothers : उत्तर देवांना द्यावीत, दानवांना नाहीत; युतीच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी केली उद्धव ठाकरेंची पाठराखण…राज–उद्धव यांची ऐतिहासिक युती

Thackeray Brothers : मागच्या २ दशकांपासून महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आज आला. राज ठाकरे आणि...

By: Team Navakal
Thackeray Brothers
Social + WhatsApp CTA

Thackeray Brothers : मागच्या २ दशकांपासून महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आज आला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत आपल्या युतीची जाहीर घोषणा केली. आणि राजकीय वर्तुळात एकच लाट पसरली. युतीच्या आधी या दोन्ही बंधूनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन देखील केले.

या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राची देखील आठवण काढली. त्यांच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंनी देखील संयुक्त महाराष्ट्राच्या काळातील काही आठवणी सांगितल्या. संपूर्ण ठाकरे घराणं त्यावेळी मुंबईसाठी संघर्ष करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले. मुंबई मिळवल्यानंतर मुंबईच्या न्याय हक्कासाठी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केल्याची आठवण देखील उद्धव यांनी सांगितली. शिवाय त्यांनी केंद्रातील सरकारवर देखील टीका केली ते म्हणतात दिल्लीत बसलेल्या लोकांचे अर्थात केंद्रातील नेत्यांचे मुंबईचे लचके तोडण्याचे मनसुबे आहेत असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे.

मनसे शिवसेना युतीवर उद्धव ठाकरेंचं वक्तव्य
आमचं कर्तव्य म्हणून आज आम्ही एकत्र आलो. आम्ही एकत्र आलॊ आहोत ते एकत्र राहण्यासाठी असा दृढ विश्वास देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मराठी माणसाला मुंबई पासून तोडणाऱ्याचा खात्मा करू असं घणाघाती वक्तव्य देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आता चुकाल तर मुकला असे आव्हान देखील त्यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाला केले आहे.

मनसे शिवसेना युतीवर राज ठाकरेंचं वक्तव्य
शिवसेना आणि मनसे युतीची घोषणा करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्ही जागावाटपाचा फॉर्म्युला सांगणार नसल्याचे स्पष्ट केले.महाराष्ट्रातील राजकारणावर प्रचार सभेत सविस्त भाष्य करिन असे राज यांनी पत्रकार परिषदेत सांगतिले. पुढे ते बोलतात मी एका मुलाखतीत म्हटलं होतं की कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आणि तिथून आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली होती. यावेळी राज ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपाचे नाव न घेता जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात सध्या लहान मूल पळवण्याच्या टोळ्या आहेत आणि त्यात आजून २ राजकीय टोळ्या सक्रिय झाल्या ज्या राजकीय पक्षातील मूल पळवत आहेत असा घणाघाती वार देखील राज यांनी या पत्रकार परिषदेत केला आहे. त्याचबरोबर त्यांनी मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि हा आमच्याच पक्षाचा होणार असा विश्वास देखील राज ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.

उद्धव यांच्यावर केलेल्या टीकेवर राज ठाकरेंचा पलटवार :
शिवाय काही दिवसांपूर्वी दानवे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती ही निवडणूक उद्धव यांची शेवटची निवडणूक आहे, कारण या निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्तेच राहणार नाही अशी टीका दानवेंनी केली होती. यावर राज ठाकरे प्रतिउत्तर देत म्हणाले उत्तर देवांना द्यावीत दानवांना नाहीत त्यांच्या या वाक्यावर पत्रकार परिषदेत एकच हश्या पिकला. त्यामुळे आता ठाकरे बंधूंची युती महायुतीच्या नाकीनव आणते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे देखील वाचा – Thackeray Brother Alliance : महापालिकेच्या सिंहासनासाठी ठाकरे बंधूंची संयुक्त चाल :६ वर्षांनंतर ब्लू सी हॉटेलमध्ये पुन्हा इतिहास; वाचा ठाकरे बंधूंच्या युती पर्यंतचा संघर्षमय प्रवास..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या