Home / महाराष्ट्र / उबाठाच्या कोल्हापुरातील दोनप्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

उबाठाच्या कोल्हापुरातील दोनप्रमुख पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

कोल्हापूर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक नेते, पदाधिकारी आपली भविष्यातील दिशा...

By: Team Navakal

कोल्हापूर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक नेते, पदाधिकारी आपली भविष्यातील दिशा ठरवत पक्षांतर करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray group) पश्चिम महाराष्ट्रात मोठा धक्का बसला आहे. कोल्हापुरातील (Kolhapur) शिवसेनेचे उपनेते संजय पवार (sanjay pawar) आणि शहर समन्वयक हर्षल सुर्वे (Harshal Surve) यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यानंतर हर्षल सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.

संजय पवार यांच्याकडे शिवसेनेच्या उपनेत्याबरोबरच जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या उपनेतेपदाची पुनर्नियुक्ती झाली होती आणि जिल्हाप्रमुख पदासाठी नव्या नावांचा विचार सुरू झाला होता. या पदासाठी हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे आणि रवीकिरण इंगवले यांची नावे चर्चेत होती. मात्र पक्षश्रेष्ठींनी रवीकिरण इंगवले यांच्या नावावर अंतिम मोहोर उमटवली. त्यामुळे नाराज झालेल्या हर्षल सुर्वे यांनी इंगवले यांच्या नेतृत्वात काम करण्यास नकार देत तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही तासांतच त्यांनी शिवसेना (शिंदे गट) (Shiv Sena Shinde faction)मध्ये प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटाला कोल्हापूरसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Web Title:
For more updates: , , , , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या