Home / महाराष्ट्र / Thar falls Tamhini Ghat: ताम्हिणी घाटात थार ५०० फूट दरीत कोसळली ! चौघांचा मृत्यू

Thar falls Tamhini Ghat: ताम्हिणी घाटात थार ५०० फूट दरीत कोसळली ! चौघांचा मृत्यू

Thar falls Tamhini Ghat – पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) आज सकाळी झालेल्या अपघातात एक थार गाडी ५०० फूट...

By: Team Navakal
Thar falls Tamhini Ghat
Social + WhatsApp CTA

Thar falls Tamhini Ghat – पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) आज सकाळी झालेल्या अपघातात एक थार गाडी ५०० फूट खोल दरीत कोसळल्याने (Thar falls Tamhini Ghat) चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माणगावकडून पुण्याच्या दिशेने जाणारी थार गाडी ताम्हिणी घाटात एक तीव्र वळणावरून थेट ५०० फूट दरीत कोसळली. चालकाला या वळणाचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना झाल्याचे सांगितले जात आहे. या थार गाडीत सहाजण होते. ते कोकणातून परतीच्या प्रवासात ही दुर्घटना घडली. दोन दिवसांपूर्वी रात्री ही दुर्घटना घडली. नातेवाईकांचा त्यांच्या मुलांशी संपर्क होत नसल्याने त्यांनी मुलांचे नंबर ट्रेस केले. तेव्हा ते ताम्हिणी घाटात असल्याचे लक्षात आले. पालकांनी पोलिसांना कळवल्यानंतर त्यांचा शोध सुरू केला, तेव्हा त्यांची गाडी दरीत कोसळल्याचे निदर्शनास आले.

दरी अत्यंत खोल असल्याने बचावकार्य कठीण होत होते. यामुळे ड्रोनच्या सहाय्याने पाहणी करण्यात आली. ड्रोन कॅमेऱ्यात चार मृतदेह दिसल्यानंतर बचाव पथकाने मृतदेह वर आणण्यात आले. दोन जण अजूनही सापडलेले नाही.


हे देखील वाचा – 

नागपूरात दाट वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार, बिबट्याला पकडण्यासाठी पोलीस आणि वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन

 मुंबईत दिवसाढवळ्या खुणांचा थरार! कांदिवलीत बिल्डरवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या

नवले पूल नव्याने उभारणार; मंत्री उदय सामंतांची घोषणा

Web Title:
संबंधित बातम्या