Home / महाराष्ट्र / मदर डेअरीची जागा अदानीला देण्यास लोक चळवळचा विरोध

मदर डेअरीची जागा अदानीला देण्यास लोक चळवळचा विरोध

मुंबई – कुर्ला येथील मदर डेअरीची (Mother Dairy) जमीन धारावी पुनर्विकासासाठी अदानी समुहाला कवडीमोल भावात देण्याच्या निर्णयाला आपली लोक चळवळने...

By: Team Navakal
Mother Dairy land

मुंबई – कुर्ला येथील मदर डेअरीची (Mother Dairy) जमीन धारावी पुनर्विकासासाठी अदानी समुहाला कवडीमोल भावात देण्याच्या निर्णयाला आपली लोक चळवळने (The Aapli Lok Chalwal)कडाडून विरोध केला असून याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी चालविली आहे.
मदर डेअरीच्या या २१ एकर भूखंडाची किंमत सुमारे १३०० कोटी रुपये आहे. तो अवघ्या ५७.८६ कोटी रुपयांना धारावी पुनर्विकासासाठी (redevelopment)देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अदानी समुहाने (Adani Group)धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील १२०० एकर जागा राज्य सरकारकडे मागवण्यात आली होती. या मागणीनुसार धारावी पुनर्विकास प्राधिकरणाला (डीआरपी) मुलुंडसह काही ठिकाणच्या जागा देण्यात आल्या आहेत. त्यात कुर्ल्यातील मदर डेअरीचीही जागा समाविष्ट आहे. ही जागा पुनर्विकासाच्या २५ टक्के दरात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.कुर्ल्यातील नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला असून, या जागेवर उद्यान किंवा सार्वजनिक सुविधा उभारावी, अशी मागणी केली आहे

Web Title:
संबंधित बातम्या