Ambabai mandir– सध्या नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने अंबाबाईच्या मंदिराबाहेर (Ambabai mandir)असलेल्या संगीत खांबातून रोजच्या विशेष पूजारूपाचे वर्णन ऐकण्याची पर्वणी भाविकांना मिळत आहे. अंबाबाई मंदिर परिसरात चारही प्रवेशद्वाराबाहेर बसवण्यात आलेल्या संगीत खांबांतून रोज मंत्रोच्चार,भक्तिगीताचे सूर आळवले जातात. आता याच संगीत खांबातून नवरात्रीच्या विशेष पूजारुपाचे वर्णन ऐकायला मिळत आहे. पूजेची सर्व माहिती संगीत खांबाच्या माध्यमातून सांगितली जात आहे.यामुळे स्क्रीनवर देवीची पूजा बांधताना आणि संगीत खांबातून पूजेची माहिती भाविकांना मिळत आहे. त्यामुळे भाविकांची या संगीत खांबाजवळ गर्दी होऊ लागली आहे.
दरम्यान,अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या दिव्यांग तसेच वृद्ध, आजारी भाविकांना देवस्थान व्यवस्थापनाच्यावतीने व्हिलचेअरची सोय केली आहे.देवस्थान कार्यालयात १५ व्हिलचेअर उपलब्ध आहेत.गेल्या दोन दिवसांत २७० दिव्यांग भाविकांनी व्हिलचेअर सुविधेचा लाभ घेतला.
हे देखील वाचा
यंदा नवरात्रोत्सवात नवा ट्रेण्ड ;फाल्गुनी शोमध्ये ‘गरबा पॉड’