Home / महाराष्ट्र / Jain muni : कबुतरांना भूतदया दाखवेल,तोच पालिका निवडणूक जिंकणार ! जैनमुनी निलेशचंद्रांचा पुन्हा इशारा

Jain muni : कबुतरांना भूतदया दाखवेल,तोच पालिका निवडणूक जिंकणार ! जैनमुनी निलेशचंद्रांचा पुन्हा इशारा

Jain muni- दादर कबुतरखाना बंद करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाने जैन समाज आज पुन्हा आक्रमक झाला. जैन धर्मातील जीवदया तत्त्वानुसार...

By: Team Navakal
Jain muni
Social + WhatsApp CTA

 Jain muni- दादर कबुतरखाना बंद करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयाने जैन समाज आज पुन्हा आक्रमक झाला. जैन धर्मातील जीवदया तत्त्वानुसार कबुतरांना दाणा-पाणी देण्यास परवानगी द्यावी, कबुतरांना जो भूतदया दाखवेल तोच मुंबई महापालिका निवडणूक जिंकेल असे म्हणत  जैन मुनी (Jain muni) निलेशचंद्र विजय यांनी आज राजकीय पक्षांना  इशारा दिला.


निलेशचंद्र विजय म्हणाले की, कबुतरखान्याचा प्रश्न हा जीवदयेशी  संबंधित आहे. प्रत्येक इमारतीत जाऊन आम्ही जैन समाजाला संघटित करत आहोत. दादर कबुतरखान्याजवळ आमरण उपोषणाला बसणार आहोत. जे प्राण्यांचा विचार करतात, तेच मुंबई महापालिकेवर राज्य करणार आहेत. आज जैनांचे या विषयावर आंदोलन होणार होते. मात्र आंदोलन न करता त्यांनी घरोघरी प्रचार करणार असल्याची घोषणा केली.


ते पुढे म्हणाले की, सरकारने मागच्या वेळी आमच्या मागण्या 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यावर अजून कोणतीही गंभीर कारवाई झालेली नाही. त्यामुळे जैन समाज संघटित करण्यासाठी अभियान सुरू केले आहे. प्रत्येक इमारतीत प्रवचन आयोजित करून जागृती केली जात आहे. या अभियानाची सुरुवात आज कुलाबा येथून होत आहे.  सरकारवर  टीका करत ते म्हणाले की, एक लाख कबुतरांचा मृत्यू झाला तरी कोणतीही चौकशी समिती स्थापन केली नाही. सरकारमध्ये खरी जीवदया असती तर दादर कबुतरखान्यावरील ताडपत्री काढली असती. आमची तुलना मौलवी किंवा मौलानांशी करू नये. आम्ही जिहाद, लव्ह जिहाद, लँड जिहाद करत नाही. आम्ही केवळ जैन समाज आणि भारताच्याविकासासाठी काम करतो.गोसंवर्धन आणि मंदिर सुरक्षा या विषयांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली.

ते म्हणाले की, कबुतरांमुळे रोगराई पसरते ही अफवा आहे. हा केवळ जैन समाजाचा मुद्दा नाही, तर प्राणिमात्रांच्या कल्याणाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात गोमातेला राज्यमाता घोषित केले असतानाही अनेक ठिकाणी गायींची हत्या केली जाते. मालेगावात रोज 15-20 गायी पकडून मारल्या जातात, अशी माहिती आहे. आता कबुतरखाना पाडण्याचा विषय पुढे करण्यात आला असून, न्यायालयाचा आदेश असल्याचे सांगितले जात आहे. जर सरकारने आमच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर दादर कबुतरखान्यावर पुन्हा आमरण उपोषण सुरू केले जाईल. आम्ही जैन समाजासाठी नव्हे, तर सर्व प्राणीमित्रांच्या कल्याणासाठी लढत आहोत.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

बंगालपाठोपाठच हैदराबादमध्येही उभारणार बाबरी स्मारक..

नाशिकसाठी महाजनांची झाडे खरेदी; झाड खरेदीसाठी गिरीश महाजन पोहोचले राजमुद्रीत

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या