Home / महाराष्ट्र / जीएसटी अधिकाऱ्याच्या घरातील चोरीचे गूढ

जीएसटी अधिकाऱ्याच्या घरातील चोरीचे गूढ

मुंबई – जीएसटी अधीक्षक उमेश नारायण यांच्या अँटॉप हिल येथील सरकारी निवासस्थानी झालेल्या सुमारे ७ लाखाच्या कथित चोरीच्या घटनेला वेगळीच...

By: Team Navakal
Theft at GST officer's house


मुंबई – जीएसटी अधीक्षक उमेश नारायण यांच्या अँटॉप हिल येथील सरकारी निवासस्थानी झालेल्या सुमारे ७ लाखाच्या कथित चोरीच्या घटनेला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी संशयावरून नारायण यांच्या एका सहकाऱ्याची झडती घेतली असता त्याच्या घरात ३९ लाख रुपयांची रोकड सापडल्याने पोलिसही चक्रावून गेले.


नारायण यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीत आपला लॅपटॉप आणि पत्नीचे दागिने असा सुमारे ६ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला, असे म्हटले होते. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना असे आढळले की नारायण यांचा एक सहकारी दीपक दहिया याच्याकडे नारायणने आपल्या फ्लॅटची एक चावी दिली होती. ९ जून रोजी ज्या दिवशी नारायण यांच्या घरात चोरी झाली, त्यादिवशी नारायण आणि दिपक दहिया नारायणच्या कारमधून कामावर गेले होते. त्यावरून पोलिसांना दहियावर संशय आला. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता तिथे ३९ लाखाची रोकड सापडली. एवढी रोकड कुठून आली असे पोलिसांनी दहियाला विचारले असता त्याने ती रक्कम आपली नसून नारायण यांची असल्याचा दावा केला. दुसरीकडे नारायण यांनी ती रक्कम आपली नाही असे सांगितले.त्यामुळे चोरीच्या घटनेला वेगळीच कलाटणी मिळाली.


पोलिसांनी दहियाला अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका झाली. पण दहियाच्या घरात सापडलेल्या रकमेचा छडा लावण्यासाठी याप्रकरणीचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या