Home / महाराष्ट्र / Best Petrol Cars India : कमी खर्चात जास्त प्रवास! ‘या’ आहेत देशातील 5 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या पेट्रोल कार्स

Best Petrol Cars India : कमी खर्चात जास्त प्रवास! ‘या’ आहेत देशातील 5 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या पेट्रोल कार्स

Best Petrol Cars India : वाहन चालवण्यासाठी इंधनावर होणारा खर्च सध्याच्या काळात डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळेच नवीन गाडी घेताना ग्राहक...

By: Team Navakal
Best Petrol Cars India

Best Petrol Cars India : वाहन चालवण्यासाठी इंधनावर होणारा खर्च सध्याच्या काळात डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळेच नवीन गाडी घेताना ग्राहक मायलेजला सर्वात जास्त महत्त्व देत आहेत. जर तुम्हालाही जास्त मायलेज आणि कमी बजेटमध्ये फिट होणारी पेट्रोल कार हवी असेल, तर मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) काही मॉडेल्सनी या सेगमेंटवर वर्चस्व ठेवले आहे.

देशातील सर्वाधिक मायलेज देणाऱ्या 5 पेट्रोल कार्स, त्यांची किंमत आणि इंजिनबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

1. मारुती सुझुकी सेलेरिओ (Maruti Suzuki Celerio):

मारुती सुझुकीची सेलेरिओ ही कार मायलेजच्या बाबतीत देशात सर्वात पुढे आहे.

  • मायलेज: एएमटी (AMT) व्हेरियंटमध्ये ही कार 26.68 किमी/लीटर पर्यंत मायलेज देते, तर मॅन्युअल व्हेरियंट 25.24 किमी/लीटर मायलेज देते.
  • इंजिन: 1.0-लीटर K10C ड्युअल जेट पेट्रोल इंजिन.
  • किंमत आणि फीचर्स: ही कार 4,69,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे आणि स्टँडर्ड 6 एअरबॅग्स यासह येते.

2. मारुती सुझुकी डिझायर (Maruti Suzuki Dzire):

डिझायर ही सेडान श्रेणीतील सर्वाधिक मायलेज देणारी आणि परवडणारी कार म्हणून ओळखली जाते.

  • मायलेज: एएमटीमध्ये 25.71 किमी/लीटर आणि मॅन्युअलमध्ये 24.79 किमी/लीटर मायलेज मिळते.
  • पॉवर: 1.2-लीटर Z12E पेट्रोल इंजिन 89 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते.
  • फीचर्स: या कारमध्ये सनरूफ, वायरलेस चार्जिंग, 6 एअरबॅग्स, ESP आणि 360-डिग्री कॅमेरा यांसारखे प्रीमियम फीचर्स मिळतात. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6,25,600 रुपये आहे.

3. मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift):

मायलेज आणि स्पोर्टी लूकचा मिलाफ असलेली ही हॅचबॅक ग्राहकांच्या पसंतीस उतरते.

  • मायलेज: ऑटोमॅटिक व्हेरियंट 25.75 किमी/लीटर तर मॅन्युअल व्हेरियंट 24.8 किमी/लीटर मायलेज देते.
  • इंजिन: यात 1.2-लीटर Z12E तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे.
  • किंमत: स्टँडर्ड 6 एअरबॅग्स आणि 360-डिग्री कॅमेरासह येणाऱ्या या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5,78,900 रुपये आहे.

4. मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki Wagon R):

वॅगन आर तिच्या उंच डिझाइनमुळे आणि मायलेजमुळे लोकप्रिय आहे.

  • मायलेज: एएमटीमध्ये 25.19 किमी/लीटर आणि मॅन्युअलमध्ये 24.35 किमी/लीटर मायलेज देते.
  • इंजिन: 1.0-लीटर K10C इंजिन 67 PS पॉवर आणि 89 Nm टॉर्क निर्माण करते.
  • किंमत: या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4,98,900 रुपये आहे.

5. मारुती सुझुकी एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso):

एस-प्रेसो ही ‘मिनी-एसयूव्ही’ म्हणून ओळखली जाते आणि उत्तम मायलेज देते.

  • मायलेज: एजीएसऑटोमध्ये 25.3 किमी/लीटर तर मॅन्युअलमध्ये 24.76 किमी/लीटर मायलेज देते.
  • इंजिन आणि शक्ती: यात 1.0-लीटर K10C इंजिन असून ते 66 bhp पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते.
  • किंमत: याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 3,49,900 रुपये आहे.

हे देखील वाचा – Maharashtra Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांचे कर्ज कधी माफ करणार? देवेंद्र फडणवीसांनी थेट तारीखच सांगितली

Web Title:
संबंधित बातम्या