Home / महाराष्ट्र / Tulsi Vivah 2025 : तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त कोणता? कोणत्या दिवशी करायचा तुळशी विवाह..

Tulsi Vivah 2025 : तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त कोणता? कोणत्या दिवशी करायचा तुळशी विवाह..

Tulsi Vivah 2025 : दिवाळी प्रकाशाने परिसर उजळून टाकणारा सण. असं म्हणतात दिवाळी हि तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी साजरी केली जाते....

By: Team Navakal
Tulsi Vivah 2025

Tulsi Vivah 2025 : दिवाळी प्रकाशाने परिसर उजळून टाकणारा सण. असं म्हणतात दिवाळी हि तुळशीच्या लग्नापर्यंत दिवाळी साजरी केली जाते. आपल्याकडे दिवाळीची जेवढ्या आतुरतेने वाट पाहिली जाते, तितक्याच आतुरतेने तुळशीच्या विवाहाचाही वाट पाहिली जाते. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीच्या काळाला चातुर्मास असे म्हटलं जातं.

आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीला श्रीविष्णू हे योग निद्रेत जातात, जे थेट कार्तिकी एकादशी म्हणजेच देव उठनी एकादशीला निद्रावस्थेतून बाहेर येतात. या संपूर्ण चातुर्मासाच्या काळात कोणतेही शुभ कार्य करत नाही. तुळशीच्या लग्नानंतर खऱ्या अर्थाने शुभ कार्याला सुरुवात होते, म्हणून तुळशीच्या लग्नाची लोक आतुरतेने वाट पाहतात. पंचांगानुसार, कार्तिक एकादशी ०१ नोव्हेंबर रोजी असणार आहे. तर द्वादशी तिथी म्हणजेच हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे, २ नोव्हेंबर २०२५ रोजी तुळशी विवाह (Tulsi Vivah 2025) साजरा केला जाणार आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादश तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो.

या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथी ०२ नोव्हेंबर रविवार सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांपासून ते ०३ नोव्हेंबर, सोमवारी सकाळी ५ वाजून ०७ मिनिटांपर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार, ०२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जाणार आहे. तसेच तुळशी विवाहानंतर पौर्णिमेपर्यंत देखील अनेक जण तुळशी विवाह साजरा करतात. तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त ०२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ५० मिनिटांपर्यंत हा मुहूर्त असणार आहे.

तुळशी विवाहाचे नेमके महत्त्व :

हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानले जाते. असं म्हणतात, ज्या घरात तुळशीचा वास असतो तिथे देवी लक्ष्मी सदैव निवास करते. त्यामुळे तुळशी विवाहाला एक विशेष महत्त्व आहे. देशभरात तुळशी विवाह मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार तुळशी विवाहाच्या पवित्र दिवशी तुळशीचे रोप आणि श्री बाळकृष्णाची मूर्ती अथवा भगवान शालिग्राम यांचा विवाह करण्याची परंपरा आहे. या दिवशी तुळशी विवाह विधी केल्यास वैवाहिक जीवनात आनंद सदा टिकून राहतो असे मानले जाते.

पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाच्या एका सुंदर मुलीचे लग्न असुरांचा राजा जालंधरशी लावण्यात आले होते. वृंदा हि मोठी पतिव्रता होती. त्यामुळे दुष्ट जालंधरला नाहीसे करण्यासाठी वृंदेची पतीव्रता मोडीत काढणे गरजेचे होते, म्हणून भगवान विष्णूने जालंधरचे रूप घेतले आणि वृंदाची तिची पतीव्रता मोडीत काढली. त्यानंतर भगवान शंकरांनी असुरांचा राजा जालंधरचा पराभव केला. मात्र, वृंदाला जेव्हा सत्य समजले तेव्हा तिने भगवान विष्णूला तिने शाप दिला शालिग्राम नावाचा दगड होण्याचा. भगवान विष्णूनीं वृंदेला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित केले आणि त्यानंतर त्यांनी तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. आणि त्या विवाहानंतर तुळशीला दैवत्व प्राप्त झाले. पुरांत याविषयी असंख्य आख्यायिका प्रसिद्ध आहेत.

हिंदू परंपरेनुसार तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य, तुळशीचे पान घातलेले पाणी मस्तकावर धारण केले तर गंगास्नानाचे पुण्य आणि मृत्यूवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्तीला वैकुंठाचे पुण्य लाभते अशी देखील मान्यता आहे.

तुळस ही बहुगुणी आणि प्रभावी औषधी वनस्पती आहे. त्यामुळे शास्त्राने देवपूजा आणि श्राद्ध यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे. एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणे, हे धार्मिकतेचे आणि सदाचाराचे सर्वाधिक मोठे प्रतीक मानले जाते. अनेक व्याधींवर तुळस हे अत्यंत प्रभावी औषध आहे. श्रीविष्णूला तुळस अतिशय प्रिय होती.

तुळशीविवाहदिवशी तुळशीवृंदावन स्वच्छ आणि सुशोभित करतात. त्यापुढे रांगोळी काढून बाळकृष्ण आणि तुळशी यांची एकत्र पूजा करतात. फराळ, मिठाईचा नैवेद्य यावेळी दाखवतात. फटाके सुद्धा फोडतात. उपस्थितांना अक्षता वाटून रितसर लग्नविधी करतात तसेच गुरुजी मंगलाष्टक म्हणतात. अया वेळी सर्वांना प्रसाद, फराळ किंवा खाऊच वाटप देखील केल जात. ज्या घरात तुळशीचा विवाह होतो, त्या घरातील उपवर मुलामुलींचा विवाह देखील सुकर होतो, अशी भाविकांची श्रद्धा असते.


हे देखील वाचा –

Google Pixel 9 Pro Fold Price : Google Pixel 9 Pro Fold ची किंमत ऐकून व्हाल थक्क! तब्ब्ल ५३,००० रुपयांची सूट, फ्लिपकार्टची खास ऑफर..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या